पिंपरी, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् राज्य संस्था, पुणे जिल्हा भारत स्काऊटस् आणि गाईड, पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय शिक्षकांकरिता आयोजित स्काऊट मास्तर व गाईड कॅप्टन प्राथमिक प्रशिक्षण शिबिराची सांगता नुकतीच भोसरी येथे झाली.
सात दिवसाच्या या प्रशिक्षणात जिल्ह्यातील 39 गाईड कॅप्टन व 55 स्काऊट मास्टर यांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी या प्रशिक्षणार्थीना स्काऊट चळवळीचा इतिहास, नियम, वचन, ध्येय, नियम, दोरीच्या गाठी, प्रथमोपचार, रोग्याला वाहून नेण्याच्या पद्धती, बंधने, नकाशा वाचन याच्यासह स्काऊट शिक्षणातील प्रथम, द्वितीय व तृतीय सोपान अभ्यासक्रमाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिराच्या समारोप प्रसंगी पिंपरी चिंचवड मनपा प्रशासकीय अधिकारी संगीता बांगर यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. यावेळेस शिल्पी शुक्ला, करुणा विश्वकर्मा, फरजना शेख, अरुण पेशकार, शिबिर संचालक अंजोलीना भाकरे, सहाय्यक दिगंबर करंडे, रफेल जाॅन स्वामी, दिलीप नेवसे, चंद्रभान पोखरकर, आनंद सोमवंशी, अपेक्षीता घारगे, शमा शिकलगार, विधा पेन्सलवार इत्यादी यशस्वी काय॔ केले. प्रशिक्षण शिबिरात प्रशांत गायकवाड, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त रायगड, सी- स्काऊट प्रमुख डॉ. गोपी शेट्टी, मनोज पवार, बिपीन देशमुख, अब्दुल नबी यांनी मार्गदर्शन केले.


