फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

लोककलावंतासाठी विशेष योजनांबद्दल पाठपुरावा करणार

लोककलावंतासाठी विशेष योजनांबद्दल पाठपुरावा करणार

निगडी : विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी निगडी ओटा स्किम येथे राहणारे लोककलावंत हलगीवादक नाना कांबळे यांच्या घरी अचानक भेट दिली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच राज्यसरकारच्या वतीने कलावंतासाठी विशेष योजना सुरु करण्यासाठी आग्रह धरणार असल्याचे आमदार अमित गोरखे यांनी यावेळी आस्वासन दिले .

यावेळी नाना कांबळे म्हणाले की ,असाच आमदार आम्हाला हवा होता जो गरीब ,वंचित समाजात सहज पोहोचू शकेल. आमचे हक्काचे आमदार अमित गोरखे माझ्या गरीबाच्या पत्र्याच्या घरात आले आणि भरपूर गप्पा मारल्या. चहापान केले. आमचे घर पावसात गळत होते त्यातही ते येऊन बसले मी आणि माझे कुटुंब धन्य पावलो, आनंद आमचा गगनात मावत नव्हता त्यामुळे मी स्वतःच डफ वाजवून त्यांचं स्वागत केलं, आता त्यांनी माझं कुठलंही काम नाही केलं तरी चालेल ते माझ्या घरी आल्यानंतर माझी समाजातील पत मात्र नक्की वाढली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"