काय कराल उन्हाळ्यात?

आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा! असा आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं. पण आरोग्य सांभाळण्याबरोबरच, उन्हाळ्यात आपण आपले विविध छंद सांभाळून, आपलं व्यक्तिमत्त्वाचा विकास अधिक चांगल्याप्रमाणे करू शकतो. शरीरयश्टी कमवू शकतो.
उन्हाळ्याचा ऋतू आरोग्यासाठी तसंच शरीरयष्टी घडवण्यासाठी आणि व्यक्तिमत्व घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, असं मला वाटतं. उन्हाळ्यामध्ये त्वचा आणि खाण्यापिण्याविषयी काही गोष्टींचे पथ्य पाळणे गरजेचे असते. माझ्यामते, उन्हाळ्यात चहा, कॉफी याचं प्रमाण कमी करावे. कारण त्यामुळे बॉडी डिहायड्रेट होत असते तसेच पाणी पिण्याचे कमी प्रमाण कमी झाल्यास डीहायड्रेशनचा त्रास आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात साधारणपणे उसाचा रस, ताक, पन्हे, कलिंगडाचा ज्यूस घेणे, अधिक चांगले आहे. त्याचबरोबर साधं जेवण करावं, त्यामध्ये जड- तळलेले तिखट पदार्थ खाणे टाळावे.
कशी घ्यावी त्वचेची काळजी…
उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा त्वचा खराब होऊ शकते. त्यामुळे त्वचेचे संरक्षण करणाऱ्या क्रीम लावून बाहेर पडावे. तसेच घराबाहेर पडताना कॉटनचे आणि लूज कपडे घालण्यास प्राधान्य द्यावे. उन्हापासून बचाव करण्यासाठी सन ग्लास वापरू शकता. मुलींनी स्कार्फ बांधावेत.
व्यायामासाठी पोषक काळ..
हा काळ व्यायाम आणि आरोग्यासाठी ही चांगला आहे. सकाळी आणि सायंकाळचे वातावरण हे व्यायामासाठी पूरक आणि पोषक असे आहेत. त्यामुळे रनिंग, वॉकिंग, स्विमिंग करता येते. उन्हाळ्यामध्ये फिजिकली ऍक्टिव्ह राहता येते. साधारणपणे कलरफुल कपडे घालून परिधान करून बाहेर पडले तर उन्हाचा त्रास होणार नाही. आपल्याला हवी तसे शरीरयश्टी कमविण्यासाठी हा अत्यंत चांगला कालखंड आहे. कारण या कालखंडामध्ये आपण जिम, चालण्याचा व्यायाम, योगा व इतर व्यायाम करू शकतो.
सहलींचाही घेता येणार आनंद!
उन्हाळ्यात सुट्ट्यांचे दिवस असतात. त्यामुळे हॉलिडे प्लॅन करता येतील. फिरण्यासाठी हा अत्यंत चांगला कालखंड आहे. आपण आपल्या आवडत्या ठिकाणांना भेटी देऊ शकतो. सहलीचा आनंद घेऊ शकतो. मनमुराद पर्यटन करू शकता. या कालखंडामध्ये लहान मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. ज्यामध्ये त्यांना बर्फाचे पदार्थ, बर्फ गोळा खायला देणे टाळावे. अन्यथा, त्यांना उन्हाळीत सर्दीचा त्रास होऊ शकतो. त्या ऐवजी त्यांना घरातच सफरचंद, संत्री, मोसंबी, कलिंगड आदी फळांचे ज्यूस द्यावेत. कैरीचं पन्हे आणि उसाचा रस हा लहान मुलांसाठी तसेच सर्वांसाठी हा चांगला आहे. शीतपेय घेण टाळावे

आणि व्यक्तिमत्व घडवण्यासाठी ही महत्त्वाचा कालखंड!
दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण विविध गोष्टी शिकू शकतो. आवडते छंद जोपासू शकतो. ज्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी आवडतात. त्या गोष्टी करण्यासाठी हा चांगला कालखंड आहे. गायन, वादन, चित्रकला, शिल्पकला असे छोटे मोठे अभ्यासक्रम आपण पूर्ण करू शकतो. त्यातून आपले छंद जोपासू शकत. त्यामुळे उन्हाळ्यात आपण स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी स्वतःची शरीरयष्टी घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि चांगला कालखंड आहे, असं मला वाटतं. त्यामुळे उन्हाळ्यात घाबरून न जाता, प्रत्येकाने उन्हाळ्यात आपण काय करू शकतो याचे नियोजन करु शकतो.