भिडे पूल पुन्हा पाण्याखाली

पुणे, प्रतिनिधी : गेल्या दोन दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली असली तरी पुणे आणि परिसरातील धरणक्षेत्राद पाऊस अजूनही सुरू आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढल्यानं पुण्यातील भिडे पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पुण्याच्या धरणक्षेत्रात पाऊस सुरु असल्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रातून प्रवास करु नका असं आवाहन प्रशासनाकडून पुणेकरांना करण्यात आलं आहे. मागच्या आठवड्यात खडकवासला धरणातून मध्यरात्री अचानक विसर्ग सुरू केल्यामुळं सिंहगड रस्त्यावरील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं होतं आणि नागरिकांचे हाल झाले होते. अनेकांना बोटीनं सुरक्षित ठिकाणी यावं लागलं. प्रशासनाच्या गैर कारभारावर आणि बेजबाबदारपणावर नागरिकांनी यावेळी ठपका ठेवला.