उत्सुकता वाढवणार ‘नवरा माझा नवसाचा २’

मुंबई : येत्या २० सप्टेंबरला नवरा माझा नवसाचा २
हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. २००४ मध्ये अभिनेता सचिन पिळगांवकरांचा ‘नवरा माझा नवसाचा’ हा एव्हरग्रीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ व दिग्गज अभिनेते सचिन पिळगांवकर यांचा ‘नवरा माझा नवसाचा’ हा एव्हरग्रीन चित्रपट २००४ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने जवळपास दोन दशकं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आजही या चित्रपटातील प्रत्येक संवाद व गाणी प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आलेल्या रिलीज डेटच्या टिझर व्हिडिओला अल्पावधीतच कमालीचा प्रतिसाद मिळाला. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आलं आहे. येत्या २० सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या “नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या पोस्टरवर पहायला मिळत आहे.