छतावरील पत्रे बदलतांना पडून एका तरुणाचा पडून मृत्यू!

पिंपरी: छतावरील पत्रे बदलण्यासाठी काम करीत असताना एका व्यक्तीचा पडून मृत्यू झाला. ही घटना 21 जुलै 2026 रोजी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास (जे ब्लॉक 359, शुभम उद्योग ,एमआयडीसी भोसरी) येथे घडली. मोहम्मद सय्यद सोहराव असे मयत तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी जितेंद्र चंद्रकांत पाचरणे पोलीस हवालदार, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे यांनी फिर्याद दाखल केली आहे, समीर विजयकुमार भट (वय 53, रा. 93/11वी कलाशांती सोसायटी, चव्हाणनगर ,धनकवडी )असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम उद्योग मध्ये छतावरील पत्रे मोहम्मद सय्यद सोहराव (वय 26) या कामगाराकडून बसवून घेतले जात होते. हे काम करत असताना कामगाराला आरोपीने सुरक्षितेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना न करता हायगईने, निष्काळजीपणाचे कृत्य केले. पत्रे बदलीत असताना मोहम्मद सोहराव हा छतावरून खाली लोखंडी पाईप वर पडून डोक्यात दुखापत होऊन मयत झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खोसे हे तपास करत आहेत.

