स्वातंत्र्यदिनी यशवन सेंट्रल उजळली हरित उर्जेंने : सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन!

वर्षाकाठी तीन लाखांची वीज बचत; भविष्यासाठी एकत्र येऊयाचा नारा
वाकड : स्वातंत्र्यदिनाच्या शुभ मुहूर्तावर यशवन सेंट्रल, बिल्डिंग सी विंग सहकारी गृहनिर्माण संस्थेत २० केव्ही क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्या हस्ते संपन्न झाले. हा पर्यावरणपूरक उपक्रम शाश्वत आणि हरित भविष्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

समारंभप्रसंगी संस्थेचे रहिवासी मुकुंद अत्रे यांनी राहुल कलाटे यांचा सन्मान केला. यावेळी सी विंगचे चेअरमन धीरज महाजन, सचिव प्रतीक खंडार, समिती सदस्य आदित्य ढोले, सिबाशिष पट्टनायक, रोशनसिंग देवरे, जिवन भावरे, सुरेश वंगर, सोसायटी व्यवस्थापक करण गुंड आणि मोठ्या संख्येने रहिवासी उपस्थित होते. कलाटे यांनी सौरऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणासाठी संस्थेने उचललेल्या पावलांचे कौतुक केले. ते म्हणाले, हरित भविष्यासाठी एकत्र येऊया! “हा उपक्रम केवळ ऊर्जा बचतीच नव्हे, तर शाश्वत विकासाच्या दिशेने एक प्रेरणादायी पाऊल आहे. यशवन वाकड सेंट्रलच्या रहिवाशांनी आणि समिती सदस्यांनी दाखवलेली कटिबद्धता इतरांसाठी आदर्शवत आहे.” समिती सदस्यांनी व रहिवाशांनी राहुल कलाटे यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या सौरऊर्जा प्रकल्पामुळे महिनन्याला २५ हजार तर वर्षाला तीन लाखाहुन अधिक रुपयांची वीज बचतीसह कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे. सोसायटीचा कॉमन एरिया, स्ट्रीट लाईट, लिफ्ट व इतर कामांसाठी उपयोग होणार आहे. हा उपक्रम पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने एक प्रेरणादायी पाऊल ठरेल, ज्यामुळे इतर गृहनिर्माण संस्थांनाही असेच पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्याची प्रेरणा मिळेल.