फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांचा भाजपाला जाहीर पाठिंबा!

कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांचा भाजपाला जाहीर पाठिंबा!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकीय पटलावर मोठी आणि निर्णायक घडामोड घडली असून, कष्टकरी, रिक्षा चालक व असंघटित कामगारांचे बुलंद नेतृत्व म्हणून ओळख असलेले डॉ. बाबा कांबळे यांनी भाजपाला जाहीर पाठिंबा देत आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. आगामी २०२६ च्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

viara vcc
viara vcc

पिंपरी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना डॉ. बाबा कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. “कष्टकऱ्यांचे स्वतंत्र आणि लढाऊ नेतृत्व अजित पवारांना नको आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला. आम्ही 25 वर्षे राष्ट्रवादीला साथ दिली. मात्र, आम्हाला प्रतिनिधीत्व दिले नाही. आता राज्यातील 29 महापालिका निवडणुकीमध्ये आम्ही राष्ट्रवादीच्या विरोधात काम करणार आहोत, असा इशाराही बाबा कांबळे यांनी दिला आहे.

डॉ. कांबळे म्हणाले की, कष्टकरी, रिक्षा चालक आणि असंघटित कामगारांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करत असताना जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केल्या गेल्या. एका टप्प्यावर “प्रस्थापित नेत्याच्या मुलासाठी” आपला राजकीय बळी देण्याचा प्रयत्न झाला आणि सर्व बाजूंनी कोंडी करण्यात आली. अशा कठीण काळात आमदार महेश लांडगे यांनीच खऱ्या अर्थाने मदतीचा हात पुढे केला, असे त्यांनी स्पष्ट केले.

याच सभेत डॉ. बाबा कांबळे यांनी मोठे राजकीय आवाहन करत सांगितले की, “पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ७ लाख रिक्षा चालक आणि कष्टकरी संघटनांचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही उमेदवाराला मतदान करणार नाहीत,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. हे आवाहन शहराच्या राजकारणात मोठा परिणाम घडवू शकते, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. . आमदार महेश लांडगे आणि डॉ. बाबा कांबळे यांच्या ‘दादा–बाबा’ जोडीमुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठा बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"