फक्त मुद्द्याचं!

8th September 2025
पिंपरी-चिंचवड

महिलांना भावतेय मविआची ‘महालक्ष्मी’ योजना!

महिलांना भावतेय मविआची ‘महालक्ष्मी’ योजना!

पिंपळे निलखमध्ये राहुल कलाटे यांच्या पदयात्रेत महिलांचा लक्षणीय सहभाग
चिंचवड : महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या पिंपळे निलख – विशाल नगरमधील पदयात्रेत महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन महाविकास आघाडीचे ‘महालक्ष्मी’ योजनेवर समाधान व्यक्त करत मविआचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांना भरघोस मतांनी जिंकून देण्याचा निर्धार केला.

पिंपळे निलखचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांचे आशीर्वाद घेऊन सुरु झालेल्या पदयात्रेत स्थानिक नागरिकांसह महिलांचा सहभाग लक्षणीय होता. गृहिणी ते उच्च शिक्षित मोकरदार महिलांनीही पदयात्रेत सहभाग घेतला. पदयात्रा मार्गावर महिलांनी जागोजागी औक्षण करत, ‘रामकृष्ण हरी – वाजवा तुतारी’च्या घोषणा देत कलाटे यांना पाठिंबा दिला. नवयुग मित्र मंडळ चौकात मोठया प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात आली. चिंचवडचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी यंदा बदल होणारच असा संकल्प यावेळी नागरिकांनी व्यक्त केला.

पिंपळे निलख येथून निघालेली पदयात्रा पुढे सुतार वाडा, पंचशिल नगर, आदर्श नगर, गणेश नगर, विनायक नगर, गावठाण मार्गे जगताप डेअरीकडे रवाना झाली. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, शहर काँग्रेसच्या महिलाध्यक्षा सायली नढे, आपचे रविराज काळे, काँग्रेसचे प्रभाग अध्यक्ष माणिक भांडे, महिलाध्यक्षा प्रज्ञा जगताप, सविता कांबळे, नानी जगताप, सुषमा जगताप, संकेत जगताप, भुषण इंगवले, महेश इंगवले, प्रकाश बालवडकर, आकाश साठे, विकी साठे, सुधीर कवडे, रविकिरण काळे, आकाश जगताप, भाऊ धरपळे, प्रदीप जगताप, संदीप कामठे, सागर साठे, बाळासाहेब शिंदे, गणेश आंत्रे, आनंद साठे, महेश कामठे, रवी कांबळे, विवेक जगताप, चंदा सोमवंशी, विनायक कांबळे, संदीप इंगवले, विनोद गोरगेल, राहुल खोमणे, सुषमा शिंदे, मृणाल साठे, सुषमा साठे, सीमा साठे, शीतल साठे, वैशाली साठे, संजीवनी साठे यासंह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.

टँकरमुक्त चिंचवड, ट्रॅफिकमुक्त चिंचवड, दोनवेळेचे मुबलक पाणी, महिलांना सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबित्व, भ्रष्टाचार आणि भयमुक्त चिंचवडसाठी राहुलदादा कलाटे यांनाच ‘तुतारी वाजविणारा माणूस’ या चिन्हावर निवडून देणार. – रविराज काळे, युवक शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी, पिंपरी चिंचवड

महाविकास आघाडीने मांडलेल्या महाराष्ट्रनाम्यात महिलांसाठी दरमहा ३ हजार रुपये देणारी ‘महालक्ष्मी योजना’, कृषी समृद्धी, बेरोजगार तरुणांना दरमहा ४ हजार भत्ता, कुटुंब रक्षणार्थ २५ लाखांचा आरोग्य विमा कवच या जनहिताच्या गोष्टी मांडल्या आहेत. त्याबद्दल लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मी मांडलेले चिंचवडच्या विकासाचे ‘अभिवचन’ही लोकांमध्ये लोकप्रिय होते आहे.
– राहुल कलाटे, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, महाविकास आघाडी

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"