Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
गुन्हेगारी

दहीहंडीच्या स्टेजच्या कमानीचा लोखंडी अँगल अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू!

दहीहंडीच्या स्टेजच्या कमानीचा लोखंडी अँगल अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू!

पिंपरी : जुनी सांगवी येथे दहीहंडीच्या स्टेजची कमान उतरवताना लोखंडी अँगल अंगावर पडल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सलमा पठाण (वय 45) असे मयत महिलेचे नाव आहे. दहीहंडी फुटल्यानंतर स्टेजची कमान उतरवीत असताना लोखंडी अँगल अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू झाला ही घटना शुक्रवार रात्री पाहुणे अकराच्या सुमारास जुनी सांगवी येथे घडली.

सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी माहिती दिली की. जुनी सांगवी लेन नंबर दोन मध्ये विघ्नहर्ता दहीहंडी मित्र मंडळाची दहीहंडी शुक्रवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास फुटली. दहीहंडी पाहण्यासाठी सलाउद्दीन पठाण व त्यांची पत्नी सलमा पठाण हे दोघे आले होते. दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यानंतर सलमा या परत घरी जात होत्या. त्याचवेळी स्टेजची कमान उतरवण्याचे काम सुरू होते. कमानीचा लोखंडी अँगल सलमा यांच्या अंगावर पडला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. औंध हॉस्पिटल येथे उपचाराकरिता नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. मयत पठाण यांचा मुलगा या मंडळाचा कार्यकर्ता असल्याने महिलेचा पती व मुलगा व इतर नातेवाईक या घटनेबाबत तक्रार देण्यास तयार नाहीत. सर्व चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे कोळी यांनी सांगितले.

gokul astami
gokul astami

दिल्लीतील कॉलेजमध्ये प्रवेशाच्या आमिषाने दहा लाखांची फसवणूक!
पिंपरी : दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे अमिष दाखवून एका व्यक्तीची दहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. 14 जून ते 3 सप्टेंबर 2026 या कालावधीत वाकड येथील एच एम रियालिटी कार्यालयात हा प्रकार घडला.

अमित धर्मचंद जैन (वय 45, रा रॉयल ऑरेंज काऊंटी सोसायटी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिद्धार्थ, विहान, वेदिका आणि तन्मय या चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादीच्या मुलाला दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे सांगितले. त्यासाठी तीन लाख रुपये ऑनलाईन आणि सात लाख रुपये रोख असे एकूण दहा लाख रुपये घेतले. मात्र पैसे घेतल्यानंतर मुलाला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला नाही. तसेच घेतलेली रक्कम परत न करता फसवणूक करण्यात आली. वाकड पोलीस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"