फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

बनावट कागदपत्राद्वारे जमिनीचे खरेदी खत करून महिलेची फसवणूक!

बनावट कागदपत्राद्वारे जमिनीचे खरेदी खत करून महिलेची फसवणूक!

पिंपरी: बनावट आधार कार्ड व पॅन कार्ड चा वापर करून जमिनीचे खरेदी खत करून महिलेची फसवणूक केली. 30 सप्टेंबर 2025 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय वडगाव मावळ येथे घडली.

viara vcc
viara vcc

याबाबत प्रवीण गजानन बेंडेकर यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. प्रकाश आगतराव गंगावणे (वय 45, रा. वरोडा ता. व जि. धाराशिव), देवकुमार शेषराव जाधव (वय 54, मुखेड ,जि. नांदेड), सुधीर समाधान अवसरमोर (वय 41, रा. धनाज खुर्द ,अकोला) व एक अनोळखी महिला (पत्ता, नाव माहित नाही) अशी आरोपीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांनी आपसात संगणमत करून फिर्यादीच्या पत्नीच्या कुसगाव ता. मावळ येथील गट नंबर 149 मधील 17.04 आर (गुंठे) जमीन विक्री करण्यासाठी अनोळखी महिलेस उभे करून तिच्याकडील बनावट आधार कार्ड व पॅन कार्डचा वापर करण्यात आला. खोटे खरेदीखत तयार करून ते दुय्यम निबंधक कार्यालय वडगाव मावळ येथे रजिस्टर करून फिर्यादीच्या पत्नीची फसवणूक करण्यात आली. याबाबत शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सपकाळ हे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"