सह्यांद्री किंग्ज्,सोनीगरा सुपरकिंग्ज् संघांची विजयी कामगिरी !

दुसरी ‘पिंपरी चिंचवड प्रिमीअर लीग’ टी-२० क्रिकेट स्पर्धा ; सह्यांद्री किंग्ज् सामनावीरः अभिषेक राय
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित दुसऱ्या “पिंपरी चिंचवड प्रिमीअर लीग’ (पीसीपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेत सह्यांद्री किंग्ज् आणि सोनीगरा सुपरकिंग्ज् संघांनी प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.

अभिषेक राय याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या मदतीने सह्यांद्री किंग्ज् संघाने स्पोर्ट्स स्टोरीज् ॲव्हेंजर्स संघाचा ३ गडी राखून पराभव करत सलग तिसरा विजय मिळवला. पहिल्यांदा खेळणाऱ्या स्पोर्ट्स स्टोरीज् ॲव्हेंजर्सचा डाव ९९ धावांवर मर्यादित राहीला. वेरून चौधरी याने २६ धावांची खेळी केली. अभिषेक राय याने १७ धावांमध्ये तीन गडी टिपले. फर्श अन्सारी आणि मयुर गोखले यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. हे लक्ष्य सह्यांद्री किंग्ज्ने १५.१ षटकात व ७ गडी गमावून पूर्ण केले. सुशांत अभंग याने सर्वाधिक ४४ धावा काढून संघाचे लक्ष्य सोपे केले. गिगि खोकर (१९ धावा) आणि वेदांत हंचे (१४ धावा) यांनी धावांचे योगदान दिले.
हिंजवाडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत संकेत माने याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर सोनीगरा सुपरकिंग्ज्ने मोरे पाटील पॅकर्स संघाचा ३० धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय नोंदविला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या सोनीगरा सुपरकिंग्ज् संघाने २० षटकात १५७ धावांचे लक्ष्य उभे केले. अजित गव्हाणे याने ५३ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ७१ धावांची खेळी केली. मोरे पाटील संघाच्या तिलक जाधव याने २७ धावांत ३ गडी बाद केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना मोरे पाटील पॅकर्स संघाचा डाव १८.५ षटकात १२७ धावांवर संपुष्टात आला. तिलक जाधव (३३ धावा) आणि सिद्धार्थ रोमन (२७ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. संकेत माने याने केवळ १९ धावांत ४ गडी बाद करून अचूक गोलंदाली केली. दुसऱ्या बाजुने मेधांश शिंगोटे याने दोन गडी टिपले आणि संघाचा विजय सोप केला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
सोनीगरा सुपरकिंग्ज्: २० षटकात १० गडी बाद १५७ धावा (अजित गव्हाणे ७१ (५३, ७ चौकार, २ षटकार), गोरक्क्ष जाधव २५, तिलक जाधव ३-२७, कार्तिक शेवाळे २-२५, आर्यन यादव २-३२) वि.वि. मोरे पाटील पॅकर्सः १८.५ षटकात १० गडी बाद १२७ धावा (तिलक जाधव ३३, सिद्धार्थ रोमन २७, संकेत माने ४-१९, मेधांश शिंगोटे २-२२); सामनावीरः संकेत माने; फायटर ऑफ द मॅचः तिलक जाधव;
स्पोर्ट्स स्टोरीज् ॲव्हेंजर्सः २० षटकात ९ गडी बाद ९९ धावा (वेरून चौधरी २६, लखन परासे १५, आर्यन कदम १४, अभिषेक राय ३-१७, फर्श अन्सारी २-१५, मयुर गोखले २-८) पराभूत वि. सह्यांद्री किंग्ज्: १५.१ षटकात ७ गडी बाद १०५ धावा (सुशांत अभंग ४४, गिगि खोकर १९, वेदांत हंचे १४, प्रशांत तेलंगे २-२२, प्रथमेश बिरादर २-२८); सामनावीरः अभिषेक राय; फायटर ऑफ द मॅचः प्रशांत तेलंगे;

