मुळा नदीच्या किनारी हजारो झाडांची होणार कत्तल ?

नागरिकांनी ३० जुलैपर्यंत आक्षेप नोंदवावेत
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने (PCMC) २४ जुलै रोजी एक सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये मुळा नदीकाठी वाकड ते सांगवी अशा सुमारे ९ किमी पट्ट्यात हजारो झाडे तोडण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. ही वृक्षतोड नदी सुशोभीकरण प्रकल्पासाठी करणार आहेत असा दावा महापालिका करत आहे. मात्र त्यांचा उद्देश मुळा नदी पात्र अरुंद करुन पर्यावरणावर घाला घलणे आहे.

या पट्ट्यातील मुळा नदीचा काठ हा जैवविविधतेसाठी अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील आहे. येथे अनेक स्थानिक, शेकडो वयाचे वृक्ष आहेत आणि ते नदीकाठच्या परिसंस्थेचा अविभाज्य भाग आहेत. हा भाग मोर, धनेश, चित्रबलाक, कासव, आणि पाणमांजरासारख्या अनेक पक्ष्या-प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास आहे. ही झाडे तोडल्यास त्यांच्या अधिवासाचा कायमचा नाश होईल आणि नदीच्या परिसंस्थेचा समतोल कोलमडेल.
महापालिका बऱ्याच झाडांचे पुनर्रोपण करणार असे सांगत असली तरी तज्ज्ञ आणि नागरिकांचे म्हणणे आहे की पक्षी-प्राण्यांचा अधिवास नष्ट होतो त्याचे काय? त्याखेरीज पुनर्रोपण केलेली झाडे जगण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे, विशेषतः महापालिकेचा पूर्वानुभव पाहिल्यास झाडे जगण्याची खूपच कमी शक्यता आहे.
नागरिक आक्षेप नोंदवू शकतात – शेवटची तारीख: ३० जुलै
पुणे व पिंपरी-चिंचवड रिव्हर रिव्हायव्हल हा नद्यांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेला नागरिक व सामाजिक संस्थांचा गट आहे. त्यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे, की वृक्षतोडीला आक्षेप नोंदवावा. आक्षेप नोंदवण्यासाठी पिंपरी-चिंचवडचा रहिवासी असणे आवश्यक नाही. आपल्या झाडांसाठी, आपल्या नद्यांसाठी आणि आपल्या भविष्यासाठी आता आवाज उठवण्याची वेळ आली आहे.
आक्षेप ईमेलद्वारे पाठवा :- garden@pcmcindia.gov.in , CC: commissioner@pcmcindia.gov.in
सार्वजनिक सुनावणी:- ४ ऑगस्ट २०२५ सकाळी ११:०० वाजता, स्थळ- उद्यान विभाग, यशवंतराव चव्हाण गुलाब पुष्प उद्यान, भोसरी, पुणे