फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये कामगार न्यायालयासाठी पाठपुरावा करणार

पिंपरी-चिंचवडमध्ये कामगार न्यायालयासाठी पाठपुरावा करणार

भोसरी : शहरातील लघु व मध्यम उद्योगांमध्ये तसेच विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना, युनियमच्या प्रतिनिधींना कामगार – व्यवस्थापन वादाबाबत पुणे-मुंबईत जावे लागते. मोशी येथे पिंपरी-चिंचवड न्यायालय संकुल उभारणीची पायाभरणी झाली आहे. आगामी काळात शहरात कामगार न्यायालय निर्माण व्हावे. यासाठी सर्वोतोपरी पाठपुरावा करणार आहे, असा संकल्प आमदार महेश लांडगे यांनी केला.

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी कामगारांच्या वतीने कृतज्ञता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. स्वाभिमानी कामगार संघटना, महिंद्रा अँड महिंद्रा वेहिकल्स, लॉजिस्टिक, हेवी इंजिनचे सभासद या संमेलनामध्ये सहभागी झाले होते.
कामगार-मालक यांच्यातील वातावरण सामंजस्य व सौहार्दाचे राहावे, या दृष्टीने आमदार महेश लांडगे यांनी प्रयत्न केले आहेत. कंपनीमध्ये काही प्रसंगी तणाव निर्माण झाल्यास वाटाघाटीने प्रश्न सोडविले. कामगारांसाठी कायम मातृत्वाच्या भूमिकेतून त्यांनी कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये संवाद ठेवला. कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांमधील संबंध बिघडू दिले नाहीत. कामगारांना किमान वेतन आणि मूलभूत सुविधांसह इतर अनेक लाभ मिळवून देण्यासाठी आमदार नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्या या पुढाकारातून अनेक कामगार आज स्थिरस्थावर झाले आहेत.

ईएसआय रुग्णालयासाठी कामगारांचे साकडे..
या औद्योगिक नगरीमुळेच शहर नागरूपाला आले.येथील नागरिकांचे जीवनमान उंचावले. कामगार या नगरीचा कणा आहे असे मी मानतो. या कामगारांसाठी जे जे आवश्यक आहे ते उपलब्ध करून देण्याचा माझा नेहमीच कटाक्ष राहिला आहे आणि तो यापुढेही राहणार आहे. कामगारांना ईएसआय हॉस्पिटल, कामगार न्यायालय देण्याची जबाबदारी माझी आहे असे परखड मत लांडगे यांनी यावेळी व्यक्त केले.

संमेलनामध्ये आमदार महेश लांडगे, माजी महापौर राहुल जाधव, स्वाभिमानी कामगार संघटनेचे नेते रोहिदास गाडे, अध्यक्ष जीवन यळवंडे, टाटा मोटर्स कार प्लांटचे योगेश तळेकर तसेच महिंद्रा कंपनीचे कर्मचारी प्रदीप तळेकर, राहुल तळेकर, पंकज लांडगे, अजय घाडगे, शुभम बवले, सचिन वहिले, सुरज लांडगे, आकाश गव्हाणे, गणेश भुजबळ, सचिन धापटे, सुयोग भालेकर, संतोष भुजबळ, विक्रम पाटील, प्रवीण नाळे, राजू मदगे, प्रशांत म्हस्के आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन धापटे यांनी केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"