बैलगाडा शर्यत पुन्हा बंद होऊ देणार नाही: फडणवीस

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
टाळगाव चिखली येथे बैलगाडा शर्यत झाली. त्यावेळी ”बैलागाडा शर्यती बंद झाल्यामुळे गावगाडा, शेतकºयांचे नुकसान झाले होते. आता जीवाची बाजी लावू पण बैलगाडा शर्यत बंद होवू देणार नाही, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले होते. यावेळी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव, अण्णा माऊली महाराज, आमदार राहुल कुल, प्रसाद लाड, समाधान अवताडे, नितेश राणे, सुनील शेळके, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप बोदगे उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘देशातील सर्वांत मोठी शर्यत महेश लांडगे यांनी सुरू केली. अखिल भारतीय बैलगाडा संघटना, तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनीही बैलगाडा शर्यतीसाठी योगदान दिले.’’
कोण होते आव्हान देणारे
आमदार लांडगे म्हणाले, ‘‘बैलगाडा शर्यतींचा आनंद घेता येत आहे. त्याचे श्रेय केवळ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच आहे. २०१७ पर्यंत एकाही राज्यकत्यार्ने बैलगाडा शर्यत सुरू व्हावी. याकरिता राज्य शासनाचा एक रुपयाही खर्च केला नाही. फडणवीस यांनी बैलगाडा शर्यत सुरू करण्याबाबत तमिळनाडू आणि कर्नाटकच्या धर्तीवर कायदा तयार केला. मात्र, या कायद्याला अजय मराठे या व्यक्तीने न्यायालयात आव्हान दिले. त्या मराठेच्या पाठिशी कोण होते? ’
बैल एकटा येत नाही, जोडीनं येतो अन् तेपण नांगरासकट!
नांगर कुणासाठी तर बैलगाडा शर्यतीला विरोध करणाऱ्यांसाठी
: देवेंद्र फडणवीस
चिखली जाधववाडी येथील बैलगाडा शर्यतीच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कुर्ता जॅकेट आणि पायजमा असा वेश परिधान करून आले होते. त्यावेळी मुळशी पॅटर्नचा संदर्भ देत ‘‘बैल कधी एकटा येत नाही, जोडीनं येतो, अन् ते पण नांगरासकट, असे फडणवीस यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हास्यलाट उसळली. ‘‘नांगर कुणासाठी तर बैलगाडा शर्यतीला विरोध करणाºयांसाठी असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट केला.
पिंपरी-चिंचवड शहरात चिखलीत बैलगाडा शर्यत झाली होती. त्यासाठी फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नेहमी सूटाबुटात दिसणारे फडणवीस कुर्ता-जॅकेट आणि पायजमामध्ये दिसले. या अनोख्या पेहारावाचे कारण त्यांनी कार्यक्रमात सांगितले.
फडणवीस म्हणाले, ‘‘आमदार महेश लांडगे यांनी बैलगाडा शर्यतीसाठी मला कपडे शिवून दिली आणि घालायला लावली. शर्यतीत बैलांना झूल घालत नाहीत, कारण त्यांना पळायचे असते. मात्र, मुख्य अतिथींना झूल घालून मिरवायला लांडगे यांनी लावले.’’ त्यावर उपस्थितामध्ये जोरदार हास्य लाट उसळली.
त्यानंतर पेहरावाबद्दल आणखी एक किस्सा सांगितला. फडणवीस म्हणाले, ‘‘माझ्या मित्राने मला प्रश्न विचारला. आज तुम्ही आणि लांडगे यांनी एकसारखा पेहराव का केला आहे? त्यावर मी म्हणालो की, ‘‘तुमच्या इथल्या मुळशी पॅटर्नचा डायलॉग माहिती आहे का? तर बैल कधी एकटा येत नाही, जोडीनं येतो आणि तोपण नांगरासकट. हा नांगर कुणासाठी तर बैलगाडा शर्यतीला विरोध करणाºयांसाठी आहे.’’ त्यावर जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला होता

थेट विधानसभेत बैलजोडी घेऊन गेलेला आमदार –
५ मे २०१४ रोजी अनेक संघटनांनी विरोध केल्यामुळे बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्यात आली. मात्र, शेतकऱ्यांनी वेळोवेळी तीव्र आंदोलने केली. आमदार महेशदादा लांडगे यांनी शेतकऱ्यांचे नेतृत्व केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. २६ डिसेंबर २०२१ रोजी ही बंदी उठवण्यात आली. अखिल भारतीय बैलगाडा शर्यतीचे अध्यक्ष संदीप बोडगे यांनी गावोगावच्या शेतकऱ्यांना आंदोलनासाठी एकत्र केले आणि अत्यंत पद्धतशीरपणे हा लढा लढला. कुठेही हिंसक वळण न लागता भूमिपुत्रांचे हे आंदोलन असल्यामुळे यशस्वी झाले. थेट विधानसभेत आमदार महेशदादा लांडगे बैलजोडी घेऊन गेले. ही बैलजोडी चऱ्होली गावचे घड्याळ मास्तर बाबासाहेब तापकीर आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक केतन जोरे यांची होती. आमदारांच्या या वेगळ्या पवित्र्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले. पुन्हा एकदा गावोगावचे घाट तितक्याच किंबहुना अधिक उत्साहाने रंगू लागले आहेत.
भोसरीत साकारणार बैलगाडा शर्यत शिल्प
महाराष्ट्राची संस्कृती आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा खेळ असलेला परंपरागत बैलगाडा घाट आहे. महाराष्ट्राची ग्रामसंस्कृती, बैलगाडा शर्यत यासह कुस्तीसारख्या मर्दानी खेळाबाबत नव्या पिढीत जनजागृती व्हावी. आपली शेती-माती आणि संस्कृतीबाबत अभिमान निर्माण व्हावा, या करिता या रस्त्याच्या सुशोभिकरण करण्याचा ध्यास आमदार महेश लांडगे यांनी घेतला होता. राज्यातील बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवण्यासाठी येथूनच राज्यव्यापी चळवळ उभी केली होती. अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या माध्यमातून या लढ्याला बळ देण्यात आले. सर्वोच्च न्यालयात यशस्वी लढा दिला. त्यानंतर राज्यातील बैलगाडा शर्यती सुरू झाल्या. त्यानंतर सर्वात मोठी बैलगाडा शर्यत झाली.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात मोठे बैलगाडा शर्यत शिल्प भोसरीत उभारण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक ७ येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र व भोसरी गावजत्रा मैदान परिसरात येथे ग्रामसंस्कृती, पारंपरिक क्रीडा प्रकार यासह बैलगाडा शर्यत अशी आकर्षक शिल्प उभारण्यात येणार आहेत. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच स्मशान भूमी ते अग्निशामक केंद्रापर्यंतचा रस्ता अद्ययावत पद्धतीने विकसित करण्यात येत आहे. स्मशानभूमीचेही नूतनीकरण सुरु आहे.
आमदार महेश लांडगे सांगतात, ”महाराष्ट्राची ग्रामसंस्कृती, बैलगाडा शर्यत, कुस्ती, कबड्डी, योगमुद्रा अशा विविध शिल्पांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती आणि विधायक संदेश जाईल. या संकल्पनेतून भोसरी गावजत्रा मैदान परिसर, तसेच स्मशान भूमी ते अग्निशामक केंद्रापर्यंतच्या रस्त्याचे काम करताना सुशोभिकरण करावे, अशी सूचना केली होती. त्यानुसार शिल्पाचे काम प्रगतीपथावर आहे.
बैलगाडा घाट दुरूस्तीसाठी तरतूद
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीचा स्मार्ट सिटीत समावेश झाला. स्मार्ट सिटीत शहरातील भोसरी, चिखली, तळवडे, मोशी, चºहोली या गावांच्या यात्रा जत्रांच्या प्रथा आणि परंपरा टिकून आहे. जत्रेतील बैलगाडा शर्यतीची परंपरा गेली आठ वर्षे वगळता बैलगाडा मालकांनी, आणि गावांनी अखंडपणे गावांनी जपली आहे.
गाव ते महानगर, महानगर ते मेट्रोसिटी आणि स्मार्ट सिटीतही बैलगाडा शर्यतींची परंपरा टिकून आहे. भोसरी, चिखली, तळवडे, डुडुळगाव, मोशी, चºहोली, वाकड, रावेत, किंवळे, ताथवडे, वाल्हेकरवाडी या गावांतही बैलगाडा मालक मोठया प्रमाणावर आहेत. या गावांच्या यात्रा जत्रांच्या प्रथा आजही सुरू आहेत. गेल्या आठवर्षांत बैलगाडा शर्यती थांबल्या होत्या. आता पुन्हा नव्याने सुरू झाल्याने बैलगाडा शर्यंतीची तयारी सुरू झाली आहे. काही गावांनी घाटांसाठी महापालिकेने निधी द्यावा, अशी मागणी केली आहे. यागावांमध्ये पाच ते सहा पिढयांपासून बैलगाडा शर्यतीची परंपरा जपून ठेवली आहे. बैलगाडा शर्यती बंद असल्यातरी या गावांतील मालकांनी बैलांची मुलाप्रमाणे सांभाळ केला आहे. करीत आहेत. शहरात असणाºया आठ बैलगाडा घाट नव्याने बांधणी करण्यासाठी महापालिकेने अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार आहे. देखभाल दुरूस्तीसाठी निधीची व्यवस्था करण्यात येणार आहे. पवना थडी आणि इंद्रायणी थडी महोत्सवात शर्यंतीचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच बैलगाडा घाटांवर पाच हजार लोक बसतील अशा व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी तरतूद करण्यात येणार आहे.