फक्त मुद्द्याचं!

8th September 2025
पिंपरी-चिंचवड

टू व्हीलर बाइक टॅक्सीला प्राणपणाने तीव्र विरोध करू : बाबा कांबळे

टू व्हीलर बाइक टॅक्सीला प्राणपणाने तीव्र विरोध करू : बाबा कांबळे

सरकारने ताबडतोब टू व्हीलर टॅक्सी परवानगी मागे घेण्याची मागणी
पिंपरी : महाराष्ट्र सरकारने पुणे, पिंपरी चिंचवड मुंबईसह महाराष्ट्रातील एक लाख लोकसंख्यापेक्षा अधिक असलेल्या शहरांमध्ये, टू व्हीलर टॅक्सी सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे आधीच आर्थिक अडचणी मध्ये असलेले रिक्षा व टॅक्सी चालक यांच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. त्यांचे जगणे मुश्किल होईल. यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा. रिक्षा चालक मालकांचे इतरही प्रश्न सोडवावेत, अशी मागणी रिक्षा चालक मालकांच्या वतीने करण्यात आली.

महाराष्ट्र रिक्षा पंचायत, “ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य, ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनच्या (दिल्ली) वतीने कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आरटीओच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या वेळी मागणी करण्यात आली. पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेश आव्हाड यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संतोष गुंड ,जिल्हाध्यक्ष लक्ष्मण शेलार, युवक अध्यक्ष शुभम तांदळे, विशाल ससाने, विनायक ढोबळे, अविनाश जोगदंड, सुरज सोनवणे, अनिल शिरसाट, प्रदीप आयर, मंगेश गवळी, सलीम पठाण, सागर लोंढे,विजय जावळे, संदिप कुडुंज, सोपान पवळे, रोहिदास पिंगळे, आकाश गालदर, आदी यावेळी उपस्थित होते.

viara ad
viara ad

यावेळी बाबा कांबळे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2017 पर्यंत फक्त पाच हजार रिक्षा परवाने होते. सरकारच्या मुक्त रिक्षा परवानामुळे आता पिंपरी चिंचवड शहरांमध्ये 45 हजार रिक्षा परवाने मिळाले असून 45 हजार रिक्षा रस्त्यावर आले आहेत. याचप्रमाणे पुणे शहरांमध्ये 40 हजार रिक्षा होत्या. त्यात वाढ होऊन आता एक लाख वीस हजार रिक्षा झाले आहेत. अगोदरच रिक्षाची संख्या वाढल्यामुळे प्रवासी कमी आणि रिक्षा जास्त अशी परिस्थिती झाली आहे. यामुळे प्रवासी मिळत नाहीत. रिक्षा चालकांना आपले हप्ते भरणे, संसाराची उपजीविका भागवणे, मुलांचे शिक्षण व इतर जीवन आवश्यक गरजा भागवणे अवघड झाले आहे. ते अगोदरच आर्थिक संकटामध्ये आहेत. त्यांचे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. महाराष्ट्र सरकारने टू व्हीलर टॅक्सीला परवानगी दिल्यास रिक्षा टॅक्सी व त्या व्यवसाय पूर्णपणे संपून जाईल. नवीन रोजगार निर्माण करण्याच्या सवंग घोषणेमुळे ज्यांना अगोदर परवाना देऊन रोजगार दिला आहे. त्यांचे मात्र वाटोळे होईल हे सरकारी लक्षात घेतले पाहिजे. यामुळे तातडीने सरकारने टू व्हीलर टॅक्सीला दिलेली मान्यता रद्द करावी, अशी मागणी यावेळी आम्ही निवे

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"