बार्टीच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी लावणार : अमित गोरखे

पिंपरी, प्रतिनिधी : विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रश्नाबाबत पुण्यातील बार्टी कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. त्यास आमदार अमित गोरखे यांनी सोमवारी भेट दिली. ‘शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारकडे आग्रह धरणार आहे, असे गोरखे यांना आंदोलनकर्त्यांना सांगितले.
विद्यापीठ अनुदान आयोग नवीन नियमानुसार शासनाने सर्व विद्यार्थ्यांना पन्नास टक्के शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मान्य नसल्याने बार्टी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आमदार गोरखे यांनी मुलांची भेट घेतली. मुलांशी सवांद साधला. प्रश्न जाणून घेतला. बार्टीचे महाव्यवस्थापक सुनील वारे यांची भेट घेऊन याविषयी चर्चा केली. यावेळी राहुल डांबाळे, विशाल गवळी, संजय सोनवणे, यशवंत नडघम, स्वप्नील नरबाग, अक्षय जाधव, उपोषणकर्ते हर्षवर्धन दवणे, पल्लवी गायकवाड, अक्षय जाधव,भीमराव वाघमारे,सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक निकम, पोलीस निरीक्षक मृणाल मुल्ला उपस्थित होते.
गोरखे म्हणाले, ‘संशोधक शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. शासनाने पन्नास टक्के शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय जाहीर केला .परंतु तो निर्णय मान्य नसल्याने विद्यार्थी आंदोलन सुरु ठेवले आहे. या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारशी चर्चा करून त्यांना न्याय मिळवून देणार आहे.”