पुणे विभाग धरणातील पाणी साठ्यात वाढ ; विसर्ग वाढविला!

मुळशी धरणातुन मुळा नदीपात्रात 2946 Cusecs विसर्ग
पुणे : मुळशी धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत विसर्ग सकाळी ११:०० वाजता 2946 Cusecs विसर्ग करण्यात येईल, तसेच पाऊस वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी ,जास्त करण्यात येईल.
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी असे आवाहन सुरेश कोंडूभैरी (टाटा पॅावर , मुळशी धरण) यांनी केले आहे.

धरणातून नदी पात्रात सोडण्यात आलेला एकूण विसर्ग खालील प्रमाणे
1. पिंपळगांव जोगे – 1000 क्युसेक, 2. माणिकडोह – 2014 क्युसेक , 3. येडगाव – 2000 क्युसेक, 4. वडज –6310 क्युसेक ,5. डिंभे – 5350 क्युसेक ,6. घोड – 2000 क्युसेक ,7. विसापूर – 0 क्युसेक ,8. चिल्हेवाडी – 700 क्युसेक ,9. कळमोडी – 812 क्युसेक ,10. चासकमान –2100 क्युसेक ,11. ,12. वडीवळे – 1376 क्युसेक ,13. आंद्रा – 749 क्युसेक ,14. पवना – 1000 क्युसेक ,15. कासारसाई –150 क्युसेक, 16. मुळशी – 2946 क्युसेक, 17. टेमघर – 509 क्युसेक, 18. वरसगाव – 2089 क्युसेक, 19. पानशेत – 1283 क्युसेक ,20. खडकवासला – 3416 क्युसेक ,21. नीरा देवधर – 1918 क्युसेक ,22. भाटघर –1614 क्युसेक ,23. वीर – 6737 क्युसेक ,24. नाझरे – 105 क्युसेक ,25. उजनी –16600 क्युसेक , 26 नीरा नरसिंगपूर- 20448 क्युसेक ,27 पंढरपूर भीमा नदी– 14532 क्युसेक