फक्त मुद्द्याचं!

7th September 2025
पिंपरी-चिंचवड

पवना आणि मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ!

पवना आणि मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ!

नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आवाहन

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर परिसरात तसेच धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. पवना व मुळशी धरणात पाण्याची आवक वाढली असल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या पवना आणि मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आपत्कालीन यंत्रणेला दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन देखील आयुक्त सिंह यांनी केले आहे.

viarasmall
viarasmall

आज सकाळी १० वाजल्यापासून पवना धऱणातून पवना नदीपात्रात २ हजार ८०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. तर दुपारी २ वाजल्यापासून मुळशी धऱणातून मुळा नदी पात्रात ८ हजार २०० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हवामान विभागाने पुढील काही तास धरण क्षेत्र आणि घाटमाथ्यावर पाऊस होण्याचा इशारा दिला असल्याने धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवना आणि मुळा नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे. नदीपात्राजवळ कोणीही जाऊ नये, असेही आवाहन करण्यात येत आहे.

महापालिकेची यंत्रणा सज्ज :- आपत्कालीन परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देऊन कार्यवाही करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मदत व बचाव पथकेही आवश्यक उपकरणासह सज्ज ठेवण्यात आली आहेत. आपत्तीमुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीत नागरिकांना तत्काळ मदत मिळण्यासाठी आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर उप आयुक्त व सहाय्यक आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून देखील नियुक्ती करण्यात आली आहे.

आग्निशामक विभाग महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक :- पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र – ९९२२५०१४७५, भोसरी अग्निशमन केंद्र – ९९२२५०१४७६ , प्राधिकरण अग्निशमन केंद्र – ९९२२५०१४७७, चिखली अग्निशमन केंद्र – ८६६९६९४१०१ ,थेरगाव अग्निशमन केंद्र – ७०३०९०७९९९, रहाटणी अग्निशमन केंद्र – ९९२२५०१४७८ ,मोशी अग्निशमन केंद्र – ७२६४९४३३३३, तळवडे अग्निशमन केंद्र – ९५५२५२३१०१ ,

पूर नियंत्रण कक्ष व इतर महत्त्वाचे दुरध्वनी क्रमांक :- मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष – ०२० २८३३११११ / ०२० ६७३३११११ ,अ क्षेत्रिय कार्यालय – ०२० ६८३३४०५० , ब क्षेत्रिय कार्यालय – ०२० ६८३३४३०० , क क्षेत्रिय कार्यालय – ०२० ६८३३४५०० ,ड क्षेत्रिय कार्यालय – ०२० ६८३३४७०० ,इ क्षेत्रिय कार्यालय – ०२० ६८३३५००० ,फ क्षेत्रिय कार्यालय – ०२० ६८३३५३०० , ग क्षेत्रिय कार्यालय – ०२० ६८३३५५०० , ह क्षेत्रिय कार्यालय – ०२० ६८३३५७००

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"