फक्त मुद्द्याचं!

19th March 2026
पिंपरी-चिंचवड

‘वेस्ट टू आर्ट’चा अनोखा उपक्रम; महापौर रवि लांडगे यांचा शहरभर विस्ताराचा निर्धार!

‘वेस्ट टू आर्ट’चा अनोखा उपक्रम; महापौर रवि लांडगे यांचा शहरभर विस्ताराचा निर्धार!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक ०६, धावडेवस्ती येथे “स्वच्छ सर्वेक्षण २०२६” आणि “माझी वसुंधरा ६.०” अभियानाच्या पार्श्वभूमीवर ‘वेस्ट टू आर्ट’ या अभिनव उपक्रमांतर्गत जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात पार पडला. शहर स्वच्छतेसोबतच वसुंधरापूरक दृष्टीकोन रुजविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

vcc gudhi padva
vcc gudhi padva

या कार्यक्रमास महापौर रवि लांडगे, नगरसदस्या राजश्री लांडगे, माजी नगरसदस्य राजेंद्र लांडगे, मुख्य आरोग्य निरीक्षक सतीश इंगेवाड, वैभव घोळवे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र उजिनवाल यांच्यासोबत अन्य मनपा अधिकारी, कर्मचारी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होते.

भोसरी येथील कोंडीबा लांडगे मार्ग, धावडे वस्ती परिसरात स्वच्छता मोहिम राबवून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर ‘वेस्ट टू आर्ट’ उपक्रमांतर्गत टाकाऊ वस्तूंमधून आकर्षक सजावटीच्या वस्तू तयार करून परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले. या उपक्रमामुळे ‘टाकाऊ वस्तूपासून कलाकृती’ हा संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला. यावेळी महापौर रवि लांडगे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांना कचरा न टाकण्याचे आणि शहर स्वच्छ राखण्याचे आवाहन केले. तसेच परिसरातील आर.आर.आर. सेंटरची पाहणी करून पुनर्वापराच्या संकल्पनेला अधिक बळ देण्यावर भर दिला.

कार्यक्रमादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सफाई सेवकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित नागरिकांनी ‘माझी वसुंधरा’ ६.० अभियानांतर्गत सामूहिक शपथ घेत वसुंधरा संवर्धनाचा निर्धार व्यक्त केला. महापौरांनी यावेळी ‘वेस्ट टू आर्ट’ उपक्रम शहरभर राबविण्याचा मानस व्यक्त करत, स्वच्छ व सुंदर पिंपरी चिंचवडसाठी नागरिकांच्या सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन देखील केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"