क्रिकेट स्पर्धेत व्ही.डब्ल्यू.सी.सी.व इ नाईन क्रिकेट क्लब विजयी!

पिंपरी चिंचवड करंडक T-२० क्रिकेट स्पर्धा
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशन फोर स्टार क्रिकेट मैदानावर आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत व्ही.डब्ल्यू.सी.सी.व टू नाईन क्रिकेट क्लबने विजय मिळवले. आज झालेल्या सामन्यात व्ही. डब्ल्यू. सी. सी. संघाने २० षटकात ६ बाद २४६ धावा केल्या यामध्ये अजित गव्हाणे ४५ ,सुजल श्रीखंडे ३९ , हरी सावंत १६ धावा केल्या. स्कोर स्पोर्ट्स संघाने २० षटकार ७ बाद १४६ धावा केल्या. हरी सावंत २० धावात ३ फलंदाज बाद केले.

दुसर्या सामन्यात टू नाईन क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १७७ धावा केल्या. यामध्ये स्नेहासिस साहू ४२ , ओम जाधव ३२ तर डायनिल पटेल याने २४ धावा २ फलंदाज बाद केले .तर मौलाना आझाद करत असताना १६.३ षटकात सर्वबाद ८८ धावा.सोहम साळवे १९ प्रदीप साळवे १३ धावा केल्या.स्नेहासिस साहू याने ५ धावा ३ फलंदाज बाद केले. स्नेहासिस साहू याला सामनावीर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

