मतदारांची ऑनलाईन व फील्ड व्हेरिफिकेशन करून दुबार नावे वगळावित: राहुल कलाटे

वाकड- पुनावळे -ताथवडे या प्रभाग क्रमांक 25 मध्ये 2076 दुबार मतदार
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर झालेल्या प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी मध्ये प्रचंड घोळ आणि दुबार नावांचे पीक उसळले आहे.. याशिवाय वाकड -पुनवळे -ताथवडे प्रभाग क्रमांक 25 मध्ये 4734 मतदार वाढले आहेत. हे मतदार वाढण्याबाबत संशय निर्माण झाला आहे .त्यामुळे याप्रकरणी मतदारांचे ऑनलाईन व फील्ड व्हेरिफिकेशन करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी महापालिका आयुक्त व निवडणूक अधिकारी पिंपरी चिंचवड यांना केली आहे .

20 नोव्हेंबर 2025 रोजी पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीमध्ये अनेक गंभीर अनियमितता आढळून आली आहे. हीच अनियमितता चिंचवड विधानसभा 2024 च्या निवडणुकात झाली होती .31 ऑगस्ट 2024 ते 1 ऑक्टोबर 2024 या एक महिन्यात चिंचवड विधानसभा मतदारसंघात 24 हजार 55 संशयित मतदार वाढले होते .त्यापैकी प्रभाग क्रमांक 25 मध्ये 4734 संशयित मतदार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदार वाढ होणे हे संशयास्पद आहे .सदर वाढीव मतदारांचे ऑनलाईन व फिल्ड व्हेरिफिकेशन करून योग्य ती कार्यवाही करण्याची गरज आहे असे कलाटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
चिंचवड विधानसभा निवडणूक 2024 मध्ये समान इपीआयसी असलेले क्रमांक पुनरावृत्तीत असून त्याची माहिती घेणे गरजेचे आहे. अनेक मतदारांचे ईपीआयसी क्रमांक एक सारखे असून ते दोन किंवा तीन वेळा यादीत आढळतात. अशा सर्व पुनरावृत्ती मतदारांची चाचणी करून ते कोणत्याही प्रभागात असले तरीही मतदार यादीतून वगळण्यात यावे अशी मागणी कलाटे यांनी केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील 9302 नावे वगळणत आली होती .इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या नाव वगळणीबाबत शंका निर्माण होते. चिंचवड विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यातील शिरूर विधानसभा मतदारसंघातील दहा हजार 230, वडगाव शेरी मतदार संघातील 11 हजार 64 ,खडकवासला मतदार संघातील 12330, पर्वती विधानसभा मतदारसंघातील 8238, हडपसर विधानसभा मतदारसंघातील 12798 मतदारांचा समावेश संशयास्पद आहे. या संशयित मतदारांची ऑनलाइन आणि फील्ड पातळीवर सखोल पडताळणी करून मतदारांची स्थिती तपासावी .दुबार मतदार तात्काळ हटवावेत अशी मागणी केली आहे. वाकड- पुनावळे -ताथवडे या प्रभाग क्रमांक 25 मध्ये 20 76 दुबार मतदार असून त्यांची देखील तपासणी करावी असे कलाटे यांनी म्हटले आहे.

