फक्त मुद्द्याचं!

24th March 2026
महाराष्ट्र

मतदार यादीतील घोटाळा एक नोव्हेंबरला विरोधकांचा राज्य निवडणूक आयोगावर मोर्चा!

मतदार यादीतील घोटाळा एक नोव्हेंबरला विरोधकांचा राज्य निवडणूक आयोगावर मोर्चा!

मुंबई : निवडणूक आयोगाकडे पुरावे दाखल करून आणि सलग दोन दिवस भेट घेऊनही आयोगाकडून कोणतीही समाधानकारक भूमिका न घेतल्याने राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीय मोर्चा मुंबईत काढण्याचा निर्धार केला आहे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज रविवारी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील , काँग्रेसचे सचिन सावंत, मनसेचे बाळा नांदगावकर, माकपचे प्रकाश रेड्डी उपस्थित होते.

vishnoi divali 2
vishnoi divali 2

निवडणूक आयोगाची विरोधी पक्षांनी दोन दिवस भेट घेऊनही कोणतीही समाधानकारक माहिती दिलेली नाही . त्यामुळे आयोगाच्या या मॅच फिक्सिंग विरोधात सर्व पक्ष्यांचा लढा आता तीव्र होणार आहे .काही दिवसापासूनपासून निवडणूक आयोगा विरोधात सर्व लढत आहेत .राज्यातील मतदार यादीत सुमारे एक कोटी घुसखोर असून ते कमी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आवाहन करत असल्याचे ते म्हणाले. सत्ताधारी पक्षाच्या काही आमदारांनी बोगस मतदारावरून केलेल्या वक्तव्याचा सुद्धा दाखला दिला. एक नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्रासाठी आणि लोकशाहीसाठी महत्त्वाचा असेल यापूर्वी असाच मोर्चा दिल्लीमध्ये काँग्रेसचे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी सांगितले की निवडणूक आयोगाने समाधानकारक उत्तर दिलेली नाहीत. दुबार मतदार काढण्यासाठी काय कार्यक्रम हाती घेणार ,पत्ते ज्यांचे नाहीत त्यांचे तुम्ही काय करणार आहात? हा खुलासा आयोगाने करावा . आयोग अनेक गोष्टी दडवून ठेवत आहे. ज्यांना लोकशाही बाबत अस्ता आहे त्यांनी एक नोव्हेंबर च्या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले .
मुंबई पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर मॅच फिक्सिंग चा आरोप केला आहे. सत्ताधाऱ्यांनी शेण खाल्ले. त्यांनी 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत घुसवले आहेत असा आरोप केला . एक नोव्हेंबर च्या मोर्चा जेष्ठ नेते शरद पवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहभागी होणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"