फक्त मुद्द्याचं!

19th April 2026
गुन्हेगारी

तडीपार आदेशाचा भंग; आरोपीस अटक!

तडीपार आदेशाचा भंग; आरोपीस अटक!

पिंपरी :तडीपार आदेशाचा भंग करून आपल्याजवळ धारदार लोखंडी कोयता बाळगून दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबलेल्या आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवार 18 एप्रिल रोजी पाच वाजण्याच्या सुमारास हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कंपनीच्या कंपाऊंड भिंती लगत असलेल्या रस्त्याच्या कडेला, पादचारी मार्गावर करण्यात आली.

vcc aksyay trutiya
vcc aksyay trutiya

याबाबत अनिल लालसो मोहिते पोलिस अंमलदार, संत तुकाराम नगर पोलीस ठाणे यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शुभम सुनील गायकवाड (वय 23, सुमेध बुद्ध विहाराजवळ, गांधीनगर, पिंपरी )असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शुभम गायकवाड यास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपार केलेले असताना कोणतीही कायदेशीर लेखी परवानगी न घेता आदेशाचा भंग करून तो पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाला. त्याच्याकडे धारदार लोखंडी कोयता किंमत 400रूपये हे हत्यार जवळ बाळगून दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने मिळून आला. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मुंडे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"