वाहन चोरी करणाऱी टोळी केली जेरबंद; 13 मोटरसायकली जप्त!

चाकण : महाळुंगे औद्योगिक परिसरातील मोटरसायकल चोरीचे 13 गुन्हे उघडकीस आले असून वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा उत्तर माळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याने पर्दापश केला आहे .याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. म्हाळुंगे औद्योगिक परिसरात मोटरसायकल चोरीचे अनेक प्रकार घडले असल्याने वरिष्ठ पोलिसांनी अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

त्यानुसार उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने कारवाई करून आरोपीकडून 5 लाख 50 हजार रुपये किमतीच्या 13 मोटरसायकली ताब्यात घेतल्या आहेत. ज्या ठिकाणाहून मोटरसायकल चोरीला गेल्या त्या गुन्ह्याच्या घटनास्थळी व आजूबाजूच्या ठिकाणी तपास पथकाने आरोपी आलेल्या व गेलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज व बारकाईने तपास केला. त्यानंतर अंमलदार शुभम खंडागळे यांना वाहन चोरी करणारा व्यक्ती आंबेठाण चौक चाकण येथे असल्याचे समजल्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. निलेश राजू मंडलिक (वय 24, रा. आंबेठाण चौक, चाकण, ता. खेड मुळगाव- रा. दिघी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर), संदीप साहेबराव सोनवणे (वय 25, चापडगाव ,ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) या दोन आरोपींना पोलिसांनी अटक अटक केली.
आरोपींनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी, दक्षिण माळुंगे एमआयडीसी, शिक्रापूर, करमाळा,चाकण, चतुश्रींगी पोलीस ठाणे हद्दीतील मोटरसायकली चोरी केल्या असून गुन्हे दाखल आहेत. याच टोळीकडून आणखी चार स्प्लेंडर व एक पॅशन अशा दोन लाख दहा हजार रुपये किमतीच्या पाच चोरीच्या मोटरसायकली ताब्यात घेतल्या आहेत. त्याबाबत अधिक तपास सुरू आहे .सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम,पोलीस उप आयुक्त परिमंडळ-4 श्र्वेता खेडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलिस अंमलदार राजू कोनकेरी, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, संतोष काळे, गणेश गायकवाड, मंगेश कदम, संतोष वायकर, हरी रणदिवे, शुभम खंडागळे, साहिल सांडभोर यांनी व परिमंडळ तीन कडील सहाय्यक फौजदार राजू जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

