श्री दत्त जयंती निमित्त दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन!

वाकड : येथील श्री दत्त जयंती निमित्त दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कीर्तन ,महिला भजनी मंडळ ,काकड आरती ,गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण ,हरिपाठ या विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. वाकड येथील श्री दत्त मंदिर येथे दत्त जयंती निमित्त नवनाथ तरुण मंडळ आणि वाकड ग्रामस्थांच्या वतीने खालील कीर्तनकार आपली सेवा देणार आहेत.

शुक्रवार 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत ह भ प लहू महाराज जमदाडे यांचे कीर्तन, शनिवार 29 नोव्हेंबर रोजी हभप गोरक्षनाथ महाराज सुतार मोरगाव, रविवार 30 नोव्हेंबर रोजी ह .भ .प गणेश महाराज फरतळे , सोमवार एक डिसेंबर रोजी ह .भ .प शेलिक महाराज कंधारे पुणे ,मंगळवार दोन डिसेंबर रोजी हभप आसाराम महाराज बढे, बुधवार तीन डिसेंबर रोजी ह. भ. प महंत बबन महाराज खेडकर ,गुरुवार 4 डिसेंबर रोजी ह .भ .प महंत राम महाराज वनवे शास्त्री ,शुक्रवार 5 डिसेंबर रोजी ह. भ. प गुरुवर्य श्री सखाराम महाराज गोपाळे संगमनेर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. शुक्रवार 28 नोव्हेंबर पासून पहाटे चार ते सहा काकड आरती, सकाळी सात ते अकरा गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण ,दुपारी दोन ते चार महिला भजनी मंडळ, सायंकाळी चार ते सहा हरिपाठ, सहा ते आठ किर्तन ,रात्री दहा ते बारा हरिजागरअसे कार्यक्रमाचे नियोजन आहे.

