फक्त मुद्द्याचं!

5th September 2025
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मान्यता!

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मान्यता!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शेखर सिंह होते. यावेळी सादर करण्यात आलेल्या विविध विषयांची माहिती घेत आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली व शहरात सुरु असलेल्या विकासकामांचा विभागनिहाय आढावाही घेतला.

viara vcc
viara vcc

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर,नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

स्थायी समिती बैठकीत पी एम पी एल संस्थेस विविध पासेसची रक्कम अदा करणे, ड गटातील वाहनांच्या दुरुस्ती कामी निविदा कालावधीत मुदतवाढ देणे, प्रभाग क्रमांक ८ मधील विविध कार्यक्रमांसाठी मंडप व्यवस्था करणे या कामाच्या सुधारित अंदाजपत्रकात मान्यता देणेकामी महानगरपालिकेच्या सभेकडे शिफारस करणे, अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक १५ मधील पाणीपुरवठा दुरुस्ती व नवीन जलवाहिन्या टाकण्याकरिता खोदण्यात आलेल्या चेंबरचे डांबरीकरण करणे, पिंपरी चिंचवड मनपा शास्त्रातील दत्तनगर दिघी येथील मंडपाचे सभामंडप बांधणे, ह क्षेत्रीय कार्यालय परिसरातील स्वच्छतागृह देखभाल दुरुस्ती व साफसफाईच्या कामाकरिता लहान जेटिंग मशीन खरेदी करणे, ह क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील औष्णिक धुरीकरणासाठी चार रिक्षा टेम्पो वाहन इंधन व वाहन चालकास प्रतिदिन भाड्याने घेण्याच्या निविदेस मुदतवाढ देणे, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे बाबत पीओपी गणेश मूर्तींचे शास्त्रोक्त विघटन करणेकामी पर्यावरण अभियांत्रिकी विभागामार्फत अमोनियम बायकार्बोनेट या रसायनाची शासकीय दराने खरेदी करणे, महाराष्ट्र शासन नगरपरिषद प्रशासन संचालनायमार्फत उपलब्ध होणारी रिसायकल वाहने पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत करणे व सन २०-२५ चे अंदाजपत्रकामध्ये वाढ घट करून तरतूद करणे, फ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत विविध उद्यान देखभाल करणे, महानगरपालिका कर्मचाऱ्यांना अवकारिका चित्रपट दाखविण्यासाठी आलेल्या खर्चास मान्यता देणे आदी विषयांना येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"