फक्त मुद्द्याचं!

18th June 2025
पिंपरी-चिंचवड

स्थायी समितीच्या बैठकीत शहरातीत विविध विकास कामांना मंजुरी!

स्थायी समितीच्या बैठकीत शहरातीत विविध विकास कामांना मंजुरी!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीच्या बैठकीत शहरातीत विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शेखर सिंह होते.

आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत आस्थापनेवरील विशेष तज्ञ व वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रोत्साहनपर वेतानवाढ देणे, पिंपरी गाव येथील मंदिराजवळील नुतनीकरणाचे विद्युत विषयक कामे, क्रांतिवीर चाफेकर राष्ट्रीय स्मारक, नवीन तालेरा रुग्णालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था कासारवाडी व मोरवाडी, अभिलेख कक्ष नेहरूनगर येथे मेस्को मार्फत सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देणे, जिजामाता रुग्णालय व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे पदव्युत्तर व पदवी व पदविका अभ्यासक्रम सुरु करणे, कस्पटे वस्ती येथील मैलापाणी पंप हाउस साठी नवीन वीज पुरवठा घेणे, ह क्षेत्रीय कार्यालयातील विविध रस्ते सुशोभीकरण देखभाल करणे, प्रभाग १६ मधील पेठ क्र. ३० सर्वे नं ७७ येथे स्वामी विवेकानंद क्रीडांगण चे मैदानात रुपांतर करणे, २०२५-२६ शैक्षणिक वर्षाकरिता क्रमिक पुस्तके खरेदी करणे, डायनासोर उद्यान येथून पाणीपुरवठा होणाऱ्या भागात नवीन पाईप लाईन टाकणे, मोशी डूडूळगाव, संत तुकारामनगर भागात . पाईप लाईन टाकणे, दिघी व पाण्याच्या टाकीचे व नजीकच्या वितरण व्यवस्थेविषयक कामे करणे चिखली जलशुद्धीकरण केंद्रावरील स्टेबल ब्लिचिंग पावडर पुरवठा करणे, ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत रस्ते व खोदाई फूटपथ दुरुस्ती करणे, मनपा रुग्णालयांसाठी मनुष्यबळ पुरविणेकमी एजन्सीची नेमणूक करणे

viarasmall
viarasmall

ह, ई क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सार्वजनिक शौचालय दैनदिन साफसफाई कामाच्या खर्चास मान्यता देणे, अ क्षेत्रीय कार्यलय व फ क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभाग क्र. १३, १, ११,१२ येथे औष्णिक धुरीकरणासाठी रिक्षा टेम्पो वाहन खर्चास मान्यता, इ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्र. क्र. ३,४,५, ७ येथील वॉल पेंटिंग कामकाजाच्या खर्चास मान्यता देणे, चिखली येथील अनधिकृत बांधकामाच्या निष्कासन वेळी वापरलेल्या ड्रोनचे भाडे देणे, करआकारणी व कर संकलन विभागासाठी १० कर्मचारी नियुक्त करण्याच्या खर्चास मान्यता देणे, केमिस्ट पडे मानधनावर भरणे, भोसरी सहल केंद्र उद्यान व अंकुशराव लांडगे नाट्यगृह उद्यान देखभाल व संरक्षण कामकाजास मान्यता, विविध विभागासाठी स्कॅनर खरेदी करणे, उद्यान विभागात शोभिवंत रोपे तयार करणे व देखभाल खर्चास मान्यता, अ, ब, इ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत उद्यानाची दुरुस्ती व देखभाल करणे, चिंचवडे नगर भागातील डांबरी रस्ता दुरुस्ती करणे, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी २०२५ आयोजन करणे, पालखी व गणपती उत्सव, इतर उत्सवांसाठी स्वच्छतागृह पुरविणे, पावसाळी वाहिन्या चेंबर्स, पेव्हिंग ब्लॉक दुरुस्ती कामे करणे, रुग्णालयीन कामकाजासाठी वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स, कर्मचारी मनुष्यबळ पुरवठा करणे, लांडेवाडी, चऱ्होली, बोपखेल, महिंद्रा पिंपरी येथील पंप हाउस दुरुस्ती कामास मंजुरी देणे, तसेच प्रभाग क्र. २० येथील महेशनगर चौकातील मोकळ्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणे, थेरगाव स. नं ९, थेरगाव लक्ष्मण नगर,काळाखडक बुस्टर, पुनावळे, सांगवी गावठाण, सानाग्वी पीडब्ल्यूडी, सांगवी स. नं. ८४, पिंपळे गुरव, दापोडी कृष्णानगर, से. २२, पाटीलनगर, जाधववाडी, से. १०, गवळीमाथा रहाटणी, लांडेवाडी, दिघी, चऱ्होली, बोपखेल येथील पंप हाउस चालन करणे, पिंपरी लेव्हल पंपिंग स्टेशन निष्काशीत करणे आदी विषयांना येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगर सचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"