संदीप वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी येथील युवा नेते आणि माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. यामध्ये आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, नेत्रतपासणी यांचा समावेश होता. शिबिरात ७२ नागरीकांनी रक्तदान, ९० नागरिकांनी नेत्र तपासणी केली.
या शिबिरामध्ये ७२ नागरीकांनी रक्तदान केले आहे. तसेच ९० नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला आहे. शिबिरामध्ये वायसीएम रुग्णालय, एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय हे हॉस्पिटल सहभागी झाले. तसेच डॉ. शंकर मोसलगी व वैशाली वाळुंजकर यांनी या शिबिरास सहकार्य केले. शिबिराचे उदघाटन माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संदिप कापसे, किसन कापसे, वस्ताद दत्तोबा नाणेकर, विजय जाचक, अनिल रसाळ, हनुमंत वाघेरे, बाबा मोरे, कुणाल सातव, कुणाल लांडगे, गणेश कस्पटे आदी नागरिक उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरात डोळ्यांच्या तपासण्या मोफत करण्यात आलेल्या आहेत. शिबिरामध्ये मोतीबिंदू असणाऱ्या नागरिकांसाठी एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. संदीप भाऊ वाघेरे युवा मंचाचे अध्यक्ष हरीश वाघेरे तसेच सचिन वाघेरे, गणेश मंजाळ, रंजनाताई जाधव, समीक्षा चिकणे, चैताली विलकर, किर्ती वाळुंजकर, प्रिती साळे, विठ्ठल जाधव यांनी संयोजन केले. वाढदिवशी शहरातील विविध क्षेत्रातील खासदार, आमदार, विविध पक्षांचे नेते आणि अधिकारी आदी मान्यवरांनी वाघेरे यांच्यावर शभेच्छांचा वर्षांव करण्यात आला.