फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन

आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन

पिंपरी चिंचवड सायन्स व तारांगण येथे १२ व १३ एप्रिल दरम्यान
पिंपरी : आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिवस दरवर्षी दि. १२ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण येथे भेट देणा-या प्रेक्षकांसाठी दि.. १२ एप्रिल व १३ एप्रिल २०२५ रोजी विविध अंतराळ विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कागदी विमान कार्यशाळा [गट १] : स. ११.०० ते दु. १२.००
अंतराळ आभासी वास्तव सत्र : दु. १.०० ते दु. ३.०० (तत्काळ नोंदणी, प्रथम येणाऱ्याला प्राधान्य, मर्यादित जागा!!)
ड्रोन उडवणे सत्र: दु. ३.०० ते दु. ५.००
दिवसा आकाश निरीक्षण (टेलिस्कोपच्या सहाय्याने) : दु. ३.३० ते दु. ५.००
कागदी विमान कार्यशाळा [गट २] : दु. ४.०० ते दु. ५.००

वरीलप्रमाणे १२ व १३ एप्रिल २०२५ दरम्यान स. ११ ते सायं. ५.०० या वेळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण येथे करण्यात आले आहे. वरील उपक्रम हे पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगणला भेट देणा-या प्रेक्षकांसाठी ही अधिकची सुविधा असणार आहे. विद्यार्थी व प्रेक्षकांनी या उपक्रमांसाठी अधिकाअधिक संख्येने सहभागी होऊन वरील उपक्रमांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी सायन्स पार्क दुरध्वनी क्र. ७७४४९४४३३३ वर संपर्क साधावा.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"