फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

काळाखडक झोपडपट्टी पुनर्वसन स्थलांतरितांना वाल्हेकरवाडीकरांचा तीव्र विरोध

काळाखडक झोपडपट्टी पुनर्वसन स्थलांतरितांना वाल्हेकरवाडीकरांचा तीव्र विरोध

चिचवड : वाकड येथील काळाखडक झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्यात येत असून त्यासाठी एसआरएअंतर्गत प्रकल्प राबविण्यात येत आहे. मात्र येथील रहिवासांचे तात्पुरते पुनर्वसन वाल्हेकरवाडी चिंचवड येथे करण्यात येत असून येथील पुनर्वसनाला स्थानिक नागरीकांनी तीव्र वरोध केला आहे.
माझा गाव माझी जबाबदारी ,मी होऊ देणार नाही ,माझ्या गावची धारावी अशा आशयाचे सुचना फलक वाल्हेकरवाडी ग्रामस्तांच्या वतीने लावण्यात आले आहेत. स मस्त नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे की, वाकड काळा खडक येथील 700 झोपडपट्टी धारकांना एसआरए प्रकल्पातंर्गत वाल्हेकरवाडी येथे स्थलांतरीत करण्यात येणार आहे. वाल्हेकरवाडी चिंचवड सर्व्हे क्रकांक 84,85 जागेमध्ये पत्र्याचे शेड टाकून त्याची राहाण्याची सोय केली जाणार आहे, याचा जाहीर निषेध ग्रामस्तांच्या वतीने करण्यात आला आहे.

मोरया गोसावी संस्थानची ही जमीन असून ती काही स्थानीकांना कसण्यासाठी दिली आहे. काही जणांना बिल्डरने हाताशी धरुन भाडे तत्वावर ही जमीन घेतली आहे. काळा खडक येथील झोपडपट्टीधारकांचे पत्रा शेड उभारुन पुनर्वसन करण्याचा प्रयत्न आहे. येथील स्थलांतरीतांमुळे या परिसराची शांतता धोक्यात येणार आहे अशी येथील नागरीकांना भिती आहे. वाल्हेकरवाडीतील नागरीकांनी बैठक घेऊन निषेध केला. बैठकीत या पुनर्वसनाला तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महापालिका आयुक्त,खासदार,आमदार,सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्षांना या भागातील नागरिकांच्या सह्यांचे निवेदन दिले जाणार आहे. बैठकीला माजी उपमहापाौर सचिन चिंचवडे,माजी पक्षनेते शामराव वाल्हेकर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्रीधर वाल्हेकर,तात्या आहेर,शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"