फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या समर्थनार्थ रहाटणीतील ग्रामस्थांची ‘वज्रमुठ’!

महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या समर्थनार्थ रहाटणीतील ग्रामस्थांची ‘वज्रमुठ’!

रहाटणीतील ‘लाडक्या बहिणीं’कडून शंकर जगताप यांचे जोरदार स्वागत
चिंचवड : स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि आमदार अश्विनीताई जगताप यांच्या माध्यमातून रहाटणी गावचा चेहरामोहरा बदलला. त्यांच्या आमदार निधीतून रहाटणी गावाचा जो अविश्वसनीय विकास झाला आहे, त्यामुळे आम्हाला रहाटणीकर म्हणवून घेताना अभिमान वाटतो. त्यांनी केलेल्या याच विकासकामांची पावती म्हणून आम्ही सर्व रहाटणीतील नागरिक एकजुटीने आणि एकमताने शंकर जगताप यांना मताधिक्य देऊन विधानसभेत पाठवणार; असा संकल्प रहाटणी ग्रामस्थांनी केला आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांचा रहाटणी गावात झंजावाती प्रचार दौरा पार पडला. या दौऱ्यात रहाटणी परिसरात भव्य पदयात्रा काढून जगताप यांनी रहाटणीकरांना अभिवादन करून त्यांच्याशी संवाद साधला. रहाटणी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात नारळ वाढवून पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

त्यानंतर शंकर जगताप यांनी रहाटणीतील रामनगर, गोडांबे चौक, नखाते वस्ती, वर्धमान अंगण, क्रिस्टल ज्ञानगंगा सोसायटी, बसवेश्वर चौक, तमारा सोसायटी, रोज लँड सोसायटी, रहाटणी फाटा, एस.एन.बी.पी स्कूल रोड, नखाते वस्ती, शास्त्रीनगर, रायगड कॉलनी, हॉटेल कुणाल सह शिवतीर्थ नगर, शास्त्री नगर या परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेस नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. हलगीच्या तालात जागोजागी पुष्पवृष्टी करून नागरिकांनी जगताप यांचे जोरदार स्वागत केले.

या पदयात्रेत मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्ष सनी मानकर, माजी नगरसेवक नाना काटे, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, शिवसेनेचे शहराध्यक्ष निलेश तरस, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, माजी नगरसेवक बाबा त्रिभुवन, माजी नगरसेविका सविता खुळे, गोपाळ माळेकर, माजी नगरसेवक कैलास थोपटे, स्विकृत सदस्य संदीप नखाते, नरेश खुळे, अरुण चाबुकस्वार, गणेश नखाते, संदीप काटे, देविदास तांबे, राकेश नखाते, बाळासाहेब नखाते, सुनील कुंजीर, सागर कोकणे, विजय कांबळे, संजय भोसले, दीपक जाधव, निलेश नखाते, बाबू तांबे, रवी मसतूद, शिवसेनेचे प्रदीप दळवी, अंकुश कोळेकर, माधव मनोरे, काळूराम कवितके, संतोष जगताप, नामदेव शिंत्रे, बाळासाहेब काळे, दत्ता दाखले, विनोद चौधरी, विनोद नखाते, कांतीलाल शेलार, शामराव गोडांबे, पोपट कापसे, सागर खेडेकर, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि महिला वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"