Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

12th September 2026
गुन्हेगारी

सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीसाठी बँक खात्याचा वापर!

सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीसाठी बँक खात्याचा वापर!

पिंपरी : सायबर गुन्हेगारांनी आपल्या गुन्हेगारीत बदल केले असून बँक खाती संघटित सायबर गुन्हेगारांना वापरण्यास देऊन नागरिकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. पिंपरी सांगवी आणि वाकड पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

viara vcc
viara vcc

 पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपींनी अक्षय हेमंत गायकवाड यांच्या नावाने दि कॉसमॉस को-ऑपरेटिव बँक के मध्ये खाते उघडून त्याद्वारे 19 हजार 100 रुपयांचे संशयास्पद व्यवहार केले. या खात्याचा वापर करून देशातील दोन नागरिकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपींनी सुजन संताजी माने यांच्या नावाने आयडीएफसी बँकेत खाते उघडून या खात्यावर दोन लाख 75 हजार रुपयांचे संशयास्पद व्यवहार केले आहेत. या माध्यमातून देशातील दोन नागरिकांची 2 लाख 49 हजार 854 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.

 वाकड पोलीस ठाण्यातील प्रकरणात विकास गजानन भुजबळ याने साथीदारासह आयडीएफसी फर्स्ट बँकेत खाते उघडून त्यावर 8 लाख 88 हजार 382 रुपयांचे संशयास्पद व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. या खात्याचा वापर करून देशातील चार नागरिकांची 1 लाख 27 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित पोलीस ठाण्यातील पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"