विनापरवाना गणेश विसर्जन मिरवणूक; गुन्हा दाखल!

पिंपरी : विनापरवाना गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आल्याने सांगवी पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला . पोलीस हवालदार तुषार साळुंखे यांनी याबाबत तक्रार दिली आहे .

बिपिन जयप्रकाश उपाध्याय असे गुन्हा दाखल झालेल्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. पिंपळे सौदागर मधील मुख्य रस्त्यावर बिपिन यांनी कुठलीही परवानगी न घेता पोलिसांना पूर्वकल्पना न देता सार्वजनिक मिरवणूक काढली. यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांब रांगा लागल्या, विसर्जन मिरवणुकी दरम्यान कर्कश आवाजात डीजे लावण्यात आला होता. डीजे आणि कर्कश आवाजात स्पीकर लावू नयेत असे पोलिसांनी आवाहन केले होते. या आदेशाचा भंग करून मिरवणूक काढली. म्हणून अखेर बी एन एल कलम 223 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 136 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्कश आवाजात डीजे लावण्यात आल्याने काही मंडळांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.