Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
देश विदेश

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा!

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा!

कॉक्रोज जनता पार्टीचा दणका
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज शनिवार 25 जुलै रोजी अखेर राजीनामा दिला आहे. नीट परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणावरून गेल्या महिन्यापासून दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामेची मागणी कॉक्रोज जनता पार्टीकडून करण्यात आली होती.

viara vcc
viara vcc

याच मुद्द्या वरून पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक हे देखील बेमुदत उपोषणाला बसले होते. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत होता. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी आणि विद्यार्थी ठाम होते. त्यातच 20 जुलै रोजी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार केल्याने सरकारच्या विरोधात असंतोष वाढत चालला होता. सरकारने हे आंदोलन चिरडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु विद्यार्थ्यांना जनतेचा पाठिंबा मिळाल्याने सरकारला अखेर माघार घ्यावी लागली.

आज शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष केल्याचं पाहायला मिळाले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी म्हटले की,आपण करून दाखवलं . दीपके आणि आंदोलकांनी जंतर-मंतरवर जल्लोष केला. शुक्रवार 24 जुलै रोजी कॉक्रोच जनता पार्टीचे शिष्टमंडळ आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि मंत्री जितेंद्र सिंह यांच्या जवळपास दोन तास बैठक झाली होती. या बैठकीत कॉक्रोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाकडून विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकार समोर मांडण्यात आल्या. त्याच बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांनी दिली होती.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"