एकच वेळी ३५ लेखकांच्या २८ पुस्तकांचे प्रकाशन

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : बिग्रो सक्सेस एज्युकेशन संस्थेच्या मार्गदर्शनातून ३५ लेखक आणि २८ पुस्तके एकच वेळी प्रकाशित करण्याचा विक्रम पिंपरी-चिंचवड येथील एका मॉल मध्ये झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला.
पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी उत्पादन शुल्क अधीक्षक कोल्हापूरचे स्नेहलता नरवणे, कुतवळ फूड्स चे प्रकाश शेठ कुतवळ, विंग्स पब्लिकेशनचे डायरेक्टर दीपक परबत, माजी डीआरडीओ शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर, मा. कार्यकारी अभियंता रामदास जगताप, विशेष न्याय दंडाधिकारी अहिल्यानगरचे भास्कर भोस, विलासराव देशमुख लॉ कॉलेजचे चेअरमन वीरूपक्ष अंकलकोटे, ईशवेद बायोटेक चे संस्थापक संजय वायाळ पाटील, पाटील ऑटोमेशन चे संचालक संजय पत्रा, रिच्युअल सायन्स अँड सायकॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट च्या मनिका सिंह, गो गल्फ कन्सल्टन्सीचे कैलास पिंजाणी, माजी कुलगुरू अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी डॉ. एकनाथराव खेडकर आणि बिग्रो सक्सेस एज्युकेशन चे संस्थापक दादा भापकर आणि मोहसिन पठाण आदी सदस्य उपस्थित होते.
शास्त्रज्ञ अशोक नगरकर यांनी आपल्या भाषणात लेखकांना पेटंट या विषयात काही मार्गदर्शन हवे असल्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. अजिंक्य डी वाय पाटील चे कुलगुरू एकनाथ खेडकर म्हणाले की, लेखनातून आर्थिक प्रगती साध्य करता येते आणि वाचनाने व्यवसाय वृध्दींगत करता येतो. मान्यवरांनी सर्व लेखकांना शुभेच्छा दिल्या. यंदाच्या वर्षी देखील बिग्रो सक्सेस एज्युकेशन परिवाराने सलग दुसरा विश्व रेकॉर्ड केला असून, पुस्तकांच्या प्रकाशन आणि लेखन या क्षेत्रामध्ये तरुणांची आवड वाढवण्यासाठी एक कौतुकास्पद पाऊल पुढे टाकले आहे.