Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

20th September 2026
गुन्हेगारी

फायनान्स कंपनीकडून ताबा घेतलेल्या फ्लॅटवर अनधिकृत ताबा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!

फायनान्स कंपनीकडून ताबा घेतलेल्या फ्लॅटवर अनधिकृत ताबा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!

पिंपरी : पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड शिवाजीनगर यांच्यामार्फत कायदेशीर ताबा घेतलेला फ्लॅट नंबर 201, ग्लोबल सेरेनिटी, बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील फ्लॅटचे बँकेने लावलेले सील व कुलूप तोडून अनाधिकृतपणे, बेकायदेशीररित्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 5 सप्टेंबर ते आज पर्यंत फ्लॅट नंबर 201, सी विंग, ग्लोबल सेरेनिटी, बोराडेवाडी, मोशी येथे घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी किरण रामचंद्र पवार (वय 38, फ्लॅट नंबर 102, देवेंद्र राधा कृष्ण बिल्डिंग, रास्ता पेठ, पुणे) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .मोहन विश्वास सपकाळ (वय 56), मंगल मोहन सपकाळ (वय अंदाजे 50, रा. फ्लॅट नंबर 201, ग्लोबल सेरेनिटी, बोऱ्हाडे वाडी, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

indra dairy
indra dairy

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड शिवाजी नगर यांच्यामार्फत कायदेशीर ताबा घेतलेले फ्लॅट नंबर 201, ग्लोबल सेरेनिटी, बोऱ्हाडेवाडी, मोशी) येथील फ्लॅटला लावलेले बँकेचे सील व कुलूप आरोपींनी तोडून नुकसान करून अनधिकृत, बेकायदेशीररित्या फ्लॅटमध्ये ताबा घेऊन राहत असल्याचे मिळून आले. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक खडसे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"