चारधाम यात्रेसाठी ट्रॅव्हल्स कंपनीकडून चार लाख रुपयांची फसवणूक!

पिंपरी : सोशल मीडियावर चारधाम यात्रेची हिमालयान हेली सर्विसेस कंपनीची जाहिरात आली होती. ही जाहिरात पाहून संपर्क केला असता मोबाईल धारकाने यात्रेची माहिती देऊन चारधाम यात्रेसाठी 4 लाख चारशे रुपये ऑनलाईन पाठवले. त्यानंतर पुन्हा संपर्क केला असता संबंधित व्यक्तीने फोन न उचलता फसवणूक केली. ही घटना 27 जुलै ते 26 ऑगस्ट 2026 या कालावधीत सेक्टर नंबर 29, हेन्टीला अपार्टमेंट, प्राधिकरण, रावेत येथे घडली.
याप्रकरणी रामविलास बनारसी दास गुप्ता (वय 66) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिषेक कपूर (पूर्ण पत्ता नाव माहित नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे राहते घरी असताना त्यांच्या मोबाईलवर फेसबुक या सोशल मीडियावर चारधाम यात्रेकरिता हिमालयन हेली सर्विसेस कंपनीची जाहिरात आली होती. ही जाहिरात पाहून त्यावर संपर्क केला. अभिषेक कपूर हे हिमालयन टूर्स नावाने मोबाईल क्रमांकावर होते .त्यांनी चारधाम यात्रा प्रवासाची माहिती देऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे चारधाम यात्रेसाठी 4 लाख चारशे रुपये ऑनलाईन फिर्यादीने पाठवले. त्यानंतर चारधाम प्रवासासाठी प्रत्येक व्यक्तीचा वेगळा विमा भरावा लागेल असे सांगून फिर्यादी यांना आणखी 30 हजार रुपये भरण्यास सांगितले.

फिर्यादी यांना आरोपीवर संशय आल्याने त्यास संपर्क केला असता आरोपीने फोन उचलले नाहीत. बुकिंग केलेली विमानाची तिकिटे रद्द करून सदर रक्कम स्वतः काढून फिर्यादी यांची 4 चार लाख 400 रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. रावेत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आवारे, पोलीस निरीक्षक घाडगे हे तपास करत आहेत. चारधाम यात्रेसाठी ट्रॅव्हल्स कंपनीकडून चार लाख रुपयांची फसवणूक!

