फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

20 हजार 534 रुपये किमतीचा तंबाखूजन्य गुटखा जप्त!

20 हजार 534 रुपये किमतीचा तंबाखूजन्य गुटखा जप्त!

पिंपरी: आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या तंबाखूजन्य गुटखा, सुगंधी सुपारी असा एकूण 20 हजार 534 रुपये किमतीचा माल एका व्यक्तीकडून जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवार 16 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चिंचवड स्टेशन रोडच्या कडेला, दर्पण टी स्टॉल, टाटा मोटर्स कंपनी समोर चिंचवड येथे घडली.

viara vcc
viara vcc

याबाबत गोविंद देवराम डोके पोलीस शिपाई अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दर्पण कुमार ललनगिरी (वय 31) व पियुष कुमार ललनगिरी (वय 26 ) (दोघेही रा. विघ्नेश्वर बिल्डिंग, चौथा मजला, धनेश्वर मंदिराजवळ चिंचवडगाव) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा आदेशाचे उल्लंघन करून शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य गुटखा, सुगंधी तंबाखू व पान मसाला गुटखा असा एकूण 20534रूपये किंमतीचा माल अवैधरित्या खरेदी करून विक्री करता आपल्या जवळ बाळगला यावरून ही कारवाई करण्यात आली. चिंचवड पोलीस ठाण्याचे उप पोलीस निरीक्षक मोहिते पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"