फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
राजकारण

भाजपाची सदस्य नोंदणी मोहीम

भाजपाची सदस्य नोंदणी मोहीम

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनविण्यासाठी पक्षाची सदस्य नोंदणी मोहीम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली.

भाजपाच्या सदस्य नोंदणीचा दुसरा टप्पा येत्या १० जानेवारीपासून महाराष्ट्रात सुरू करण्यात येणार आहे. १.५ कोटी प्राथमिक सदस्यांची नोंदणी करून पक्षाला हा टप्पा गाठायचा आहे. ‘घर चलो अभियान’ अंतर्गत, महाराष्ट्रातील एक लाख मतदान केंद्रांखालील सर्व घरांपर्यंत पोहोचण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना सांगितले.

(संदर्भ – पीटीआय)

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"