दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीला तिघा जणांनी केली बेदम मारहाण!

एका आतोपीस अटक
पिंपरी : फुगेवाडी कडून पवार वस्ती कडे घरी पायी चालत जाणाऱ्या दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीला तिघा जणांनी बेदम मारहाण करून धारदार कट्टर सारख्या वस्तूने वार करून गंभीर जखमी केले . घटना 13 मे 2026 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दापोडी कब्रस्तानचे विरुद्ध बाजूस पवना नदी ब्रिज जवळ, दापोडी- पिंपळे गुरव- सांगवी रोड, दापोडी येथे घडली.

याप्रकरणी रवी राजूलिंगम पिल्ले (वय 43, रा. दापोडी पवार वस्ती, शेख भाई गिरणी समोर यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .गोविंद (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही), ऋषिकेश सुनील घोरपडे (वय 20, राम मोहन नगर गोडाऊन चौक, गणेश मंदिर भोसरी), एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून आरोपी क्रमांक दोन यास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी फुगेवाडी कडून पवार वस्तीकडे घरी पायी जाताना तो दारूच्या नशेत असल्यामुळे रस्त्यावरून जाणारे येणारे लोकांना शिवीगाळ करत होता.
सदर ठिकाणी आरोपी नंबर एक व त्याच्यासोबत असलेल्या एक अनोळखी व्यक्ती यांनी फिर्यादीला गाठून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. आरोपीकडे असलेल्या कसल्या तरी धारदार कटरसारख्या वस्तूने फिर्यादीच्या डाव्या कानावर, कानाखाली, डाव्या जबड्याच्या खाली, मानेवर डाव्या पायाच्या मांडीवर मारून गंभीर जखमी केले .दापोडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जासूद हे तपास करत आहे.

