फक्त मुद्द्याचं!

7th September 2025
पिंपरी-चिंचवड

प्राधिकरणात चेंबरमध्ये विषारी वायूने तिघांचा मृत्यू!

प्राधिकरणात चेंबरमध्ये विषारी वायूने तिघांचा मृत्यू!

कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत देण्याची आमदार गोरखे यांची मागणी
पिंपरी :  प्राधिकरणातील भेळ चौकात अ प्रभाग कार्यालयाच्यासमोर समोरील रस्त्यावर मलनिस्सारण वाहिनी आहे. एका दूरसंचार कंपनीच्या वायरचे काम करण्यासाठी भुयारी चेंबरमध्ये मध्ये तिघेजण उतरले. विषारी वायूमुळे तिघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.

मल:निसारण वाहिनीमध्ये उतरलेले कर्मचारी हे आरोग्य विभागाचे असावेत, मात्र प्रत्यक्ष दर्शनी चौकशी केल्यानंतर हे कंत्राटी कर्मचारी एका दूरसंचार कंपनीचे असल्याचे समजले. या दुर्घटनेत दत्ता होलारे, लखन धावरे, आणि साहेबराव गिरसेप या तीन निष्पाप कामगारांनी आपले प्राण गमावले. स्वातंत्र्यदिनासारख्या शुभ दिवशी त्यांच्या घरातील आधारस्तंभ गमावल्याने कुटुंबांची अवस्था दयनीय झाली आहे.

viara vcc
viara vcc

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागरिकांची तक्रार आल्याने दुपारच्या सुमारास एका दूरसंचार कंपनीच्या वायरच्या संदर्भात काम करण्यासाठी चार कर्मचारी येथे आले. त्यांची वायर ही मलनिस्सारण वाहिनीच्या जवळून जात होती. मल निसरण वाहिनीचे झाकण उघडून एकेक करून तीन जण आतमध्ये उतरले. तर एक जण बाहेरच होता. बराच वेळ झाल्यानंतरही आतून प्रतिसाद येत नसल्याने चौथ्या कर्मचाऱ्याने आरडाओरडा केला. त्यानंतर आजूबाजूचे लोक आले. अग्निशामक दलाच्या पथकास पाचरण करण्यात आले. त्यानंतर अग्निशामक दलाने मलिनिसरण वाहिनीमधील तिघा जणांना बाहेर काढले. ते बेशुद्ध असल्याने त्यांना तातडीने जवळच्या लोकमान्य रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

मल:निसारण वाहिनीमध्ये उतरलेले कर्मचारी हे आरोग्य विभागाचे असावेत, मात्र प्रत्यक्ष दर्शनी चौकशी केल्यानंतर हे कंत्राटी कर्मचारी एका दूरसंचार कंपनीचे असल्याचे समजले. या दुर्घटनेत दत्ता होलारे, लखन धावरे, आणि साहेबराव गिरसेप या तीन निष्पाप कामगारांनी आपले प्राण गमावले. स्वातंत्र्यदिनासारख्या शुभ दिवशी त्यांच्या घरातील आधारस्तंभ गमावल्याने कुटुंबांची अवस्था दयनीय झाली आहे.

कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदतीची मागणी
आमदार अमित गोरखे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना ईमेलद्वारे पत्र पाठवून या घटनेची माहिती दिली. या पत्रात त्यांनी मृत कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आणि जखमींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. या दुर्घटनेत श्री. दत्ता होलारे, श्री. लखन धावरे, आणि श्री. साहेबराव गिरसेप या तीन निष्पाप कामगारांनी आपले प्राण गमावले. स्वातंत्र्यदिनासारख्या शुभ दिवशी त्यांच्या घरातील आधारस्तंभ गमावल्याने कुटुंबांची अवस्था दयनीय झाली आहे.
या घटनेस जबाबदार असलेल्या संबंधित ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करून त्यांनी पीडित कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"