फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

मारहाण करून अपहरण करणाऱ्या तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

मारहाण करून अपहरण करणाऱ्या तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

पिंपरी : रस्ता विचारण्याच्या कारणावरून वाद झाल्याने चार जणांना मारहाण करून दोन जणांचे अपहरण करून फरार झालेल्या आरोपींना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने अटक केली आहे .

viara vcc
viara vcc

आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 डिसेंबर रोजी हा गुन्हा घडला .पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस निरीक्षक संतोष कसबे व पोलीस कर्मचारी यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दाखल गुन्ह्यातील एक संशयित इसम हा देहू फाटा आळंदी येथे थांबला असल्याची खात्री मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक भरत गोसावी, पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, पोलीस अमलदार  बाबासाहेब गर्जे ,अजित रुपनवर ,योगेश कोळेकर, शशिकांत नांगरे, निखिल फापळे, बाळासाहेब भांगले व सुंदर थोरात यांनी सापळा लावून संशयित सुबोध मल्हारी कांबळे (वय 20 ,श्रीराम कॉलनी, आळंदी रोड, भोसरी) याला ताब्यात घेतले .

आरोपीकडे चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा त्याने चार साथीदारासह केला असल्याची कबुली दिली. फरार आरोपी हे भोसरी परिसरामध्ये असल्याचे सांगितल्याने लागलीच तपास पथकाने ओंकार संजय कांबळे (वय 18 ,राहणार दिघी ),सुरज महादेव शिंदे (वय 19 रा. भोसरी) व दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले .रस्ता विचारण्याच्या कारणावरून वाद झाल्याने फिर्यादी सुदर्शन महादेव आडे व त्याचे मित्र विकास अर्जुन सोनकांबळे ,संतोष भाऊसाहेब हंबर्डे यांना मारहाण केली. त्यांचेकडील रोख पाचशे रुपये व दोन मोबाईल फोन काढून घेतले. छोटा हत्ती टेम्पोमध्ये फिर्यादींना बसवून विकास अर्जुन सोनकांबळे ,संतोष भाऊसाहेब हंबर्डे यास घेऊन आळंदी चाकण रस्त्याकडे जाणाऱ्या जंगलामध्ये मारहाण करून सोडून दिले. अशी कबुली आरोपींनी दिली. आरोपीकडून दोन मोबाईल फोन व गुन्ह्यातील छोटा हत्ती टेम्पो असा चार लाख सात हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त करून गुन्हा उघडकीस आणला .

अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर . अप्पर पोलीस आयुक्त सारंग अवाड ,पोलीस उपयुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. विशाल हिरे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे संतोष कसबे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा क्रमांक तीन यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी तपास केला. .

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"