फक्त मुद्द्याचं!

8th September 2025
पिंपरी-चिंचवड

निगडी येथील दुर्घटनेनंतर संबधितावर गुन्हा दाखल न झाल्याने तीव्र संताप!

निगडी येथील दुर्घटनेनंतर संबधितावर गुन्हा दाखल न झाल्याने तीव्र संताप!

२४ तासांत गुन्हा दाखल करा अन्यथा तीव्र आंदोलन : डॉ. बाबा कांबळे
निगडी : येथील बीएसएनएलच्या इन्स्पेक्शन चेंबर दुर्घटनेतील मृत आणि जखमी कामगारांच्या कुटुंबियांना तात्काळ न्याय, आर्थिक मदत आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी मृत कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये आणि जखमी कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये आर्थिक मदत तात्काळ जाहीर करावी आणि या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेची माहिती राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे आणि पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक निगडी यांना पत्र पाठवून दिली असल्याचे कष्टकरी कामगार पंचायत संस्थापक अध्यक्ष आणि कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी सांगितले.

viara vcc
viara vcc

डॉ. बाबा कांबळे यांनी निगडी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन, या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मजुरांच्या मृत्यूनंतर तात्काळ गुन्हा दाखल करणे आवश्यक असताना देखील आतापर्यंत गुन्हा दाखल झाला नाही, याबाबत डॉ. बाबा कांबळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, येत्या २४ तासांत गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. शासनाला आवाहन केले आहे की, या दुर्घटनेला केवळ एक अपघात म्हणून न पाहता, कामगारांच्या सुरक्षिततेच्या आणि हक्कांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून गांभीर्याने पाहावे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, “कष्टकरी कामगार हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यांच्या सुरक्षिततेकडे आणि कल्याणाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे समाजाच्या प्रगतीला बाधा आणणे होय.”

पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी परिसरात, १५ ऑगस्ट २०२५ रोजी, स्वातंत्र्यदिनासारख्या पवित्र आणि शुभ दिवशी, बीएसएनएलच्या इन्स्पेक्शन चेंबरमध्ये ऑप्टिकल फायबरच्या कामादरम्यान घडलेल्या एका भीषण दुर्घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत तीन कष्टकरी कामगार दत्ता होलारे, लखन धावरे आणि साहेबराव गिरसे यांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबांवर दुखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या घरातील आधारस्तंभ हरपल्याने कुटुंबियांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या पैकी एक कामगार नांदेड जिल्ह्यातील असून, दोन कामगार धाराशिव जिल्ह्यातील आहेत. पोटाचे खळगे भरण्यासाठी आलेल्या या मजुरांवर काळाने घात केला असून, या घटनेला सर्वस्वी संबंधित अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार आहेत. दुर्घटनेस जबाबदार असलेल्या ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकावे आणि त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अळी मागणी कांबळे यांनी केली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"