गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि लेझर बीमचा वापर अंगलट!

40 गणेश मंडळासह डीजे चालक, वाहन मालकांवर गुन्हे दाखल
पिंपरी गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा कर्कश आवाज आणि लेझर बीमचा वापर करणे पिंपरी चिंचवड मधील गणेश मंडळांच्या अंगलट आला आहे. याप्रकरणी 40 गणेश मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत .याशिवाय डीजेचा मालक आणि वाहन चालक मालकांवरही गुन्हे दाखल केले आहेत. डीजेच्या आवाजाची पातळी निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त नसावी, लेझर बीमचा वापर करू नका अशा सूचना पोलिसांनी सार्वजनिक गणेश मंडळांना दिल्या होत्या मात्र त्याकडे मंडळांनी दुर्लक्ष केले.

त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्वच भागातील गणेश मंडळांनी नियम मोडले आहेत .पोलिसांच्या तपासणीत ध्वनी शेपकांचा आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा अधिक असल्याने ध्वनी प्रदूषण वाढले. याबाबत मंडळाच्या अध्यक्ष ध्वनी शेपकांचे चालक, मालक आणि ट्रॅक्टर मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता कलम 223 प्रमाणे 40 मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये वाकड पोलीस ठाण्यात सतरा, पिंपरी आठ, निगडि पाच, सांगवी पाच, दापोडी तीन आणि तळेगाव दाभाडे येथे दोन मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .
नॉईज लेवल मीटर या उपकरणाद्वारे पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीत ठीक ठिकाणी ध्वनीच्या पातळीची मोजणी करण्यात आली आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन आणि प्रकाश झोतांचा वापर करणाऱ्या मंडळांचा गुन्हे दाखल करण्यात आलेल्या मध्ये समावेश आहे गुन्हा दाखल झालेल्या मंडळांची चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार यांनी सांगितले