फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
पिंपरी-चिंचवड

गवळी माथा ते इंद्रायणी चौकापर्यंतच्या सव्वा किलोमीटर रस्त्याची 82 कोटींची निविदा रद्द करावी:मारुती भापकर

गवळी माथा ते इंद्रायणी चौकापर्यंतच्या सव्वा किलोमीटर रस्त्याची 82 कोटींची निविदा रद्द करावी:मारुती भापकर

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी भ्रष्ट अधिका-यांवर कारवाई करावी
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील टेत्को रस्त्यावरील भोसरीतील गवळी माथा ते इंद्रायणी चौकाकापर्यंतच्या सव्वा किलोमीटरचा रस्ता महापालिका अद्यावत पध्दतीने विकसित करणार आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूने मार्गिका, वाहनतळ, सायकल ट्रॅक, हरितपट्टा, सेवा वाहिन्या, पदपथ, व्यायामशाळा, शौचालय उभारणार आहे. या कामासाठी तब्बल 81 कोटी 77 लाख 55 हजार 556 रूपये खर्च करण्यात येणार आहे. हे काम धनेश्वर क्रन्स्ट्रक्शनला देण्यास मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे आपण या रस्त्याच्या कामासाठी महापालिका कर्ज काढणार आहे. त्यामुळे महापालिकेत प्रशासकीय राजवटीत कर्ज काढून सण साजरे करण्याचे प्रकार सुरू आहे,त्यमुळे ही संपूर्ण निविद प्रक्रीया रद्द करुन भ्रष्टाचार थांबवावा अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील काही अधिकारी, सल्लागाराशी संगणमत करून विशिष्ट अटी शर्ती कोट्यावधीचा मलिदा लाटून राजकीय वरदहस्त असणाऱ-या ठेकेदारांनाच कामे देतात. हे भ्रष्ट अधिकारी संबंधित ठेकेदाराला संपूर्ण निविदा प्रक्रियेची अगोदरच माहिती देतात, दर निश्चिती करतात, रिंग घडून आणतात, निविदा भरताना काही ठेकेदारांना दमदाटी करतात, स्पर्धा झाल्याचा आभास निर्माण करतात व महापालिकेच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडे घालतात. विकास कामांच्या नावाखाली कोट्यवधी रूपयांचा प्रशासनाच्या वतीने चुराडा सुरू आहे. महापालिकेच्या वतीने दापोडी ते निगडी आणि पिंपरी ते दापोडी या मार्गावर अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार पदपथ व सायकल ट्रॅक तयार करून सुशोभीकरण केले जात आहे. या कामासाठी सुमारे दीडशे कोटी रूपयांचा खर्च केला आहे. एकीकडे महापालिकेचे उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचे नियोजन करणे गरजेचे असताना प्रशासन अर्बन स्ट्रीटसारखा संकल्पना राबवत आहे. यासाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक होणार आहे.

viara ad
viara ad

शहरातील टेल्को रस्ता हा मुख्य रस्त्यांपैकी एक महत्वाचा रस्ता आहे. केसबी चौकापासून इंद्रायणीनगरपर्यंत हा रस्ता साडेआठ किलो मीटर अंतराचा आहे. त्यापैकी गवळी माथा ते इंद्रायणी नगर या सव्वा किलोमीटर अंतराच्या रस्त्याचा अद्यावत पध्दतीने विकास करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार म्हणून मॅप्स ग्लोबल सिव्हिलटेक प्रा. लि. यांची नियुक्ती केली. रस्त्याचे आवश्यक सर्वेक्षण आणि नकाशे तयार केले. या सर्वेक्षणात सध्यःस्थितीतील सहा पदरी रस्ता अपुरा पडत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून आले. त्यासाठी हा सव्वा किलोमीटर अंतराचा रस्ता विकसित करण्याचे नियोजन केले. त्यानुसार 90 कोटी 65 लाख 77 हजार 455 रूपयांची निविदा प्रसिध्द केली. यामध्ये केवळ दोन ठेकेदारांनी सहभाग घेतला. दोन वेळा निविदेला मुदतवाढ दिल्यानंतरही मे. धनेश्वर क्रन्स्ट्रक्शन आणि अजवाणी इन्फ्रास्ट्रक्चर या दोनच ठेकेदारांनी या कामासाठी निविदा भरली. त्यानंतर महापालिकेने 11 टक्के कमी दराची धनेश्वर क्रन्स्ट्रक्शन प्रा. लि. या ठेकेदाराची निविदा स्विकारली. त्यांच्याकडून 81 कोटी 77 लाख 55 हजार 556 रूपयांमध्ये काम करून घेण्यास आपण आयुक्त तथा प्रशासक म्हणून मान्यता दिली आहे.

मे. धनेश्वर कंट्रक्शन प्रा.लि. हा ठेकेदार राजकीय हितसंबंधातील असून महानगरपालिकेचे बहुतांशी मोठ्या रकमेची कामे तो पालिकेचा जावई असल्याप्रमाणे त्यालाच कामे मिळतात. या ठेकेदाराला हे काम देताना महापालिका प्रशासनातील अधिकारी या संगणमातात सामील असतात. ते संबंधित ठेकेदारांना आगाऊ माहिती पुरवतात, त्यातून आर्थिक लाभ पदरात पाडून घेतात. इतर ठेकेदारांना स्पर्धेत भाग घेऊ देत नाही, दमदाटी, दादागिरी करतात, संगतमत करून रिंग करतात. हे आपल्याला सर्व आपल्याला माहीत असताना देखील आपण या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे शहरातील करदात्या नागरिकांचे आर्थिक नुकसान होते.
तरी आपण या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन मे. धनेश्वर कंट्रक्शन प्रा.लि. देण्यात आलेले हे काम रद्द करावे. निविदा प्रक्रिया मध्ये सामील असणारे अधिकारी यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागमी भापकर यांनी केली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"