फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या भूमिकेमुळे महयुतीतील वाद उफाळला

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या भूमिकेमुळे महयुतीतील वाद उफाळला

चिंचवड: अजितदादांनी शब्द फिरवला.. असं म्हणत चिंचवडच्या समर्थकांनीचं थेट अजित पवारांना घरचा आहेर दिला आहे. चिंचवड विधानसभेत महायुतीने भाजपच्या शंकर जगतापांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीने काही तासांतच बैठक बोलावत थेट अजित पवारांबाबत नाराजीचा सूर आळवला. आणि दिवाळीपूर्वी महायुतीत बंडाचे फटाके फोडण्याचा ठराव केला आहे. दोन दिवसांत पुढची भूमिका जाहीर करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला आहे.

महाविकास आघाडी आमच्यातील ज्याला उमेदवारी देईल, आम्ही त्यांचाच प्रचार करु. अशी बंडाची भूमिका अजित पवारांच्या समर्थकांनी घेतली आहे. या बैठकीत नाना काटे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे या इच्छुक उमेदवारांसह माजी नगरसेवक विनोद नढे, संतोष कोकणे, दिलीप काळे, चंद्रकांत तापकीर, तानाजी जवळकर, श्याम जगताप, शिरीष काळे, प्रशांत सपकाळ, बापू कातळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
काहीही झालं तरी आम्हाला भाजपचा प्रचार करायचा नाही,अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील या नेत्यांनी ठराव केल्याप्रमाणे खरंच बंड करणार की त्याचा फटका महायुतीला बसू नये म्हणून अजित पवार या नेत्यांचे बंड थंड करणार हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष तुषार हिंगे यांचा इशारा

भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने भाजपचा प्रचार न केल्यास पिंपरी विधानसभा मतदार संघात आम्ही महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार नाही, असा थेट इशारा भाजपा युवा मोर्चाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तथा माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.राष्ट्रवादी कॅाग्रेस अजित पवार गटाने भाजपा उमेदवारांचा प्रचार न करण्याची भूमिका घेतल्याने महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.
Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"