फक्त मुद्द्याचं!

7th September 2025
अध्यात्म

ढोल-ताशांचा गजर, रांगोळीच्या पायघड्या,आणि फुलांची उधळण ; उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पााला निरोप!

ढोल-ताशांचा गजर, रांगोळीच्या पायघड्या,आणि फुलांची उधळण ; उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पााला निरोप!

हुतात्मा चापेकर चौक,चिंचवड आणि कराची चौक,पिंपरी येथे उभारलेल्या स्वागत कक्षात मंडळांचा सत्कार

पिंपरी : पारंपरिक वेशभुषेत कलाकारांनी सादर केलेला ढोल-ताशांचा गजर… रांगोळीच्या पायघड्या…आणि फुलांची उधळण… अशा उत्साहपूर्ण वातावरणात पिंपरी चिंचवड येथे गणेश विसर्जन मिरवणूक शनिवारी (६ सप्टेंबर) पार पडली.

या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या मंडळांचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले. गणेशभक्तांच्या भक्तिभावाचा सन्मान करण्यासाठी तसेच मिरवणूकीचे नियोजन करण्यासाठी महापालिकेने आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनातून पिंपरीतील कराची चौक व चिंचवडमधील हुतात्मा चापेकर चौक येथे स्वागत कक्ष उभारण्यात आलेले होते.

हुतात्मा चापेकर चौकातील स्वागत कक्षातून यंदा एकूण ३१ गणेश मंडळांनी सत्कार स्वीकारला. या कक्षामध्ये सर्वात प्रथम अजिंक्य मित्र मंडळ सायंकाळी ५.१० वाजता दाखल झाले, तर अखेरचे मोरया गोसावी क्रीडांगण मित्र मंडळ रात्री ११.५५ वाजता दाखल झाले. येथील मिरवणुकीत सहभागी झालेल्या विविध कलापथकांनी सादर केलेले ढोल ताशांचे चित्तथरारक पारंपरिक खेळ,विद्युत रोषणाईने सजविलेले रथ आणि सांस्कृतिक सादरीकरणातून केलेली आरास नागरिकांना मंत्रमुग्ध करत होती.

गौरव, सन्मान आणि महापालिकेची बांधिलकी
गणेश मंडळांच्या मिरवणूक प्रमुखांचे स्वागत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांनी केले. यावेळी उपायुक्त अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड,किशोर ननावरे,मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व मान्यवर सहभागी झाले होते.

लोकप्रतिनिधींची उपस्थिती
चिंचवड येथील स्वागत कक्षास माजी महापौर अपर्णा डोके,माजी नगरसदस्य नामदेव ढाके, गोविंद पानसरे,राजेंद्र गावडे,सुरेश भोईर,अश्विनी चिंचवडे,विठ्ठल भोईर तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. पारंपरिक रितीरिवाजांचे जतन आणि सांस्कृतिक परंपरेला दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून मंडळ प्रतिनिधींचा सत्कार यावेळी करण्यात आला. महापालिकेच्या या उपक्रमामुळे मंडळांमध्ये आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

चिंचवड येथील चाफेकर चौकात मंडळांचेस्वागत
अजिंक्य मित्र मंडळ, श्री दत्त तरुण मंडळ, श्री गणेश मंडळ चिंचवड स्टेशन, सद्गुरु मंडळ चिंचवड गाव, श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ गांधी पेठ चिंचवड, ज्ञानदीप मित्र मंडळ गांधी पेठ चिंचवड, क्रांतिवीर भगतसिंग मित्र मंडळ राम आळी चिंचवड, उत्कृष्ट मित्र मंडळ भोई आळी चिंचवड, मिल्कमेड परिवार चिंचवड स्टेशन, आदर्श मित्र मंडळ तानाजी नगर चिंचवड, नव गजानन मित्र मंडळ चिंचवड, गांधी पेठ मित्र मंडळ चिंचवड गाव, मुंजोबा मित्र मंडळ चिंचवड, गावडे कॉलनी संस्कृती मित्र मंडळ चिंचवड स्टेशन, श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ, उत्कर्ष मित्र मंडळ माणिक कॉलनी चिंचवड, मोरया मित्र मंडळ गावडे भोईर आळी चिंचवड, भोईर कॉलनी मित्र मंडळ गावडे कॉलनी चिंचवड, समर्थ मित्र मंडळ दळवी नगर, नवतरुण मित्र मंडळ चाफेकर चौक, नवभारत मित्र मंडळ गावडे भोईर आळी, संतोष नगर मित्र मंडळ चिंचवड स्टेशन, शिवाजी उदय मित्र मंडळ तानाजी नगर, गावडे पार्क मित्र मंडळ चिंचवड स्टेशन, अष्टविनायक मित्र मंडळ, श्री काळभैरवनाथ मित्र मंडळ चिंचवड, समता तरुण मंडळ दळवीनगर, सुदर्शन मित्र मंडळ चिंचवड स्टेशन, मयुरेश्वर मित्र मंडळ मंगलमूर्ती वाडा, मोरया गोसावी क्रीडांगण

मिरवणुकीचे सूत्रसंचालन किरण गायकवाड,प्रफुल्ल पुराणिक,किशोर केदारी यांनी केले.

chinchwad
chinchwad
Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"