‘विठ्ठल वंदना’मधून कथक नृत्याविष्कार

पिंपरी, प्रतिनिधी : नटराज कथक संस्थेचा सहावा वार्षिकोत्सव पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिरात नुकताच साजरा झाला. कथक नृत्यशैली आणि वारकरी कीर्तन शैलीत कलाविष्कार सादर करण्यात आले.
संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत नामदेव, संत सखुबाई, संत पुरंदरदास, संत कबीर इत्यादी संतांच्या अभंगांवर ‘विठ्ठल वंदना’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून दाद दिली. आमदार माधुरी मिसाळ, श्री संत सेवा संघ पुणेचे संस्थापक संजय गुरुजी, ज्ञानेश्वरी गोडबोले, लेखिका कुमुदताई गोसावी उपस्थित होत्या. संचालिका नेहा गोडबोले-भागवत यांनी मनोगत व्यक्त केले.
विठ्ठल वंदना ह्या विषयावर आधारित संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत नामदेव, संत सखुबाई, संत पुरंदरदास, संत कबीर इत्यादी संतांच्या अभंगांवर कथक शैली आणि वारकरी कीर्तन शैलीत मनमोहक कलाविष्कार सादर केला. त्यानंतर अबीर गुलाल…’ ‘नरोहरी हरी हरी नारायण…’ आणि ‘माउली माउली…’ ह्या गाण्यांवर नृत्य सादर केले. त्यास रसिकांनी उत्कट दाद दिली. स्वप्नील मांडवीकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमात जबलपूरचे महापौर सदानंद गोडबोले आणि डॉ स्वाती गोडबोले, संत सेवा संघाच्या विश्वस्त सुश्री स्वर्णिमा, वैकुंठनायका अल्बमचे संगीत दिग्दर्शक जीवन धर्माधिकारी आणि विजय कुठवाड हे उपस्थित होते.