दिल्लीतील शाळांना धमक्यांचे सत्र सुरूच

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दिल्लीतील शाळांना धमक्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. आज (शनिवारी) सकाळी सहा वाजता पुन्हा डीपीएस आरके पुरम या शाळेत बॉम्ब असल्याची धमकी देणारा ई-मेल आला आहे. आठवड्याभरातील ही तिसरी घटना आहे.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सहा वाजता हा ई-मेल शाळेला पाठविण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर तातडीने बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, संशयास्पद काहीही आढळले नाही.
शुक्रवारी सुद्धा चार शाळांना अशा प्रकारचा ई-मेल आला होता. आणि याआधी ८ डिसेंबर रोजी दिल्लीतील ४० शाळांना धमकीचा मेल आला होता. शाळांमध्ये लहान आकाराचे पण सहजासहजी न दिसणारे बॉम्ब ठेवण्यात आले आहेत, असे ई-मेलमध्ये म्हटले होते.या बदल्यात ३० हजार डॉलर्सची मागणी करण्यात आली होती. त्या दिवाशी सगळ्या शाळांनी सुरक्षेच्या कारणास्तव मुलांना तातडीने घरी पाठवविले होते. यापूर्वी मे महिन्यात देखील दिल्लीतील शाळांना अशीच बॉम्बची धमकी देणारे ई-मेल आले होते.
(संदर्भ